शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराचा धुरळा

By admin | Updated: October 13, 2014 00:37 IST

प्रचाराला अवघे काही तास उरले असताना रविवारची सुटी ही उमेदवारांसाठी महत्त्वाची ठरली. सगळ्याच उमेदवारांनी प्रचारात रॅली व भेटींवर भर दिल्याचे दिसून आले.

पिंपरी : प्रचाराला अवघे काही तास उरले असताना रविवारची सुटी ही उमेदवारांसाठी महत्त्वाची ठरली. सगळ्याच उमेदवारांनी प्रचारात रॅली व भेटींवर भर दिल्याचे दिसून आले. रविवार असल्यामुळे कसा अधिक प्रचार करायचा याचे नियोजन शनिवारी रात्रीच झाल्याने सकाळपासून सर्व कार्यकर्ते प्रचारात उतरले. मागील १२ ते १३ दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराच्या झंझावाताची सांगता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. सोमवारी संध्याकाळी ५ ला प्रचार तोफा थंडावणार असल्यामुळे मतदारांच्या भेटीगाठींसाठी काही तासच हातात असल्यामुळे उमेदवारांनी रॅलीवर भर दिला. अनेक उमेदवारांनी सोसायट्यांकडे धाव घेतली. सोसायटीमध्ये अनेक मतदारांशी एकाच वेळी संपर्क साधता येत असल्यामुळे व सुटी असल्याने उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह तेथे धाव घेतली. सगळ्या सोसायट्यांत छोट्या सभाच सुरू असल्याचे चित्र होते. तेथील मतदारांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी उमेदवारांनी सोसायटीचे अनेक प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले, तर पक्षाचा जाहीरनामाही त्यांना दिला. पदयात्रा, जीपयात्रा यांच्या माध्यमातून सगळ्याच उमेदवारांनी रविवारी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. शहरामध्ये रॅली, पदयात्रांची धूम होती. प्रतिस्पर्धी पक्षांच्या यात्रा समोरासमोर आल्यामुळे अनेक ठिकाणी घोषणायुद्धही रंगले. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली. पर्यायाने मतदारच अडचणीत सापडला. उमेदवार जास्तीत जास्त मतदारपर्यंत कसे जाता येईल यासाठी सर्वच प्रमुख कार्यकर्ते व घरातील सर्व लहान-मोठी मंडळीही प्रचारात मोठ्या प्रमाणात दिसत होती. प्रत्येकजण आपल्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसून आला. उमेदवारांनी रॅली, गाठीभेटी याबरोबरच मोबाईलवरही व्हाईस कॉल, मेसेज, नेत्यांचे भाषण, उमेदवाराने केलेल्या कामाच्या छोट्या व्हिडिओ क्लिप तयार करून त्या अनेकांना पाठवल्या. यामुळे मतदारांवर प्रचाराचा भडिमार सहन करावा लागला. प्रत्येक रस्त्यावर, चौकात प्रचाराचा धडाका उडाला होता. शेवटचा दिवस म्हणूनच उमेदवारांची सगळी यंत्रणा कामाला लागली होती. यामुळे प्रत्येक ठिकाणी एका पक्षाची रॅली गेली की, दुसऱ्या पक्षाची रॅली येत असल्यामुळे परिसर दणाणून गेला होता. शक्तिप्रदर्शनामुळे रविवारी प्रचाराची रणधुमाळी उडाली.