शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीच्या निसर्गाचे संवर्धन आवश्यक

By admin | Updated: March 26, 2017 01:53 IST

सुसंपन्न जैवविविधतेने नटलेल्या भारत देशात विपुल प्रमाणात वनस्पती, प्राणी आहेत. मात्र, देशात नैसर्गिक

पिंपरी : सुसंपन्न जैवविविधतेने नटलेल्या भारत देशात विपुल प्रमाणात वनस्पती, प्राणी आहेत. मात्र, देशात नैसर्गिक साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. प्राणी, वनस्पती नष्ट होण्यामागची कारणे म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट आणि विकासासाठी वनसंपदेचा मोठ्या प्रमाणावर वापर हे आहे. दख्खनचे पठार, कोकण किनारा असो किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगा या जैवविविधतेने नटलेल्या निसर्गाचे संर्वधन होणे गरजेचे आहे, असे मत पुणे विभागीय वन अधिकारी शिवाजीराव फटांगरे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीच्या डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, आकुर्डीच्या वतीने भीमाशंकर अभयारण्यात तीन दिवसीय विद्यापीठस्तर जैवविविधता शिबिर आयोजित केले होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी फटांगरे बोलत होते. अहमदनगर, नाशिक,पुणे विभागातील १०५ विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले होेते. फटांगरे म्हणाले की, वन, तसेच वन्य प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी वने आरक्षित केली आहेत. वन विभाग आदिवासींवर गदा आणण्यासाठी नाही. १९९२ मध्ये शासनाने ग्रामीण लोकांच्या सहभागातून वन विकास संकल्पना राबवली. हरितसेना संकल्पनेत विद्यार्थी, सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे.कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.डी.पाटील यांनी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. आयोजन प्राचार्य डॉ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.विद्यापीठाचे मानववंशशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राम गंभीर, विभागीय वन अधिकारी फटांगरे, वनपाल तुषार ढमढेरे, वन निरीक्षक अधिकारी श्रीशैल पाटील, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक किशोर पाटील उपस्थित होेते. विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख प्रा. मुकेश तिवारी, प्रा.गणेश फुंदे, स्टाफ सेक्रटरी प्रा. शरद बोडके, प्रा. अर्चना ठुबे, प्रा. मीनल भोसले, प्रा. अंजली अकीवटे आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)राज्याचे मानचिन्ह असणारा प्राणी शेकरू, राज्याचे निसर्ग मानचिन्ह असणारे फुलपाखरू ब्युमॉरमॉन, चिमुकल्या मधमाशीपासून महाकाय अ‍ॅटलास पतंगापर्यंत आणि झाडापाशी समरूप होणाऱ्या हरणटोळापासून सळसळणाऱ्या फणीनागीपर्यंत सर्वांना सांभाळणाऱ्या या वनांचा परिसर पाहण्याची संधी वन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली. यात नाईट ट्रॅक, तसेच वनभोजनाचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर हे पवित्र स्थान पाहण्याची संधीही विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली.