शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाला जाळले

By admin | Updated: September 22, 2015 03:03 IST

जमीनवाटपाचा वाद झाल्यामुळे सख्ख्या भावालाच जाळल्याची भीषण घटना संविदणे (ता. शिरूर) येथे घडली आहे. सुरेश सोमा मोटे (वय ५५) यांचा खून करून त्याच्या भावानेच घरासमोर जाळले.

टाकळी हाजी : जमीनवाटपाचा वाद झाल्यामुळे सख्ख्या भावालाच जाळल्याची भीषण घटना संविदणे (ता. शिरूर) येथे घडली आहे. सुरेश सोमा मोटे (वय ५५) यांचा खून करून त्याच्या भावानेच घरासमोर जाळले. शिरूरचे पोलीस निरीक्षक नारायण निंबाळकर व उपनिरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री १२च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सख्ख्या भावासह त्यांची मुले व नातेवाइकांसह आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सर्व आरोपी फरार आहेत. नाथू सोमा मोटे (भाऊ) वय ५५, सचिन नाथू मोटे (२७), आशिष नाथू मोटे (२३), योगेश शिवाजी मोटे (२२), सुखदेव नाना मोटे (५५), कमल नाथू मोटे, योगश शिवाजी मोटे, रंजना शिवाजी मोटे, सुनंदा बाबाजी लंघे (सर्व रा. संविदणे) अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत. अभिमन्यू सुरेश मोटे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाथू, सुरेश व शिवाजी मोटे हे तीन भाऊ होते. यांच्यामध्ये पावणेदोन एकर जमिनीवरून सारखे वाद होत होते. सुरेश यांनी याबाबत पोलिसांत तक्रारदेखील केली होती. त्यांची आई झुंबराबाई हिने तिच्या नावावरची जमीन सुरेशला दिली म्हणून नाथू व शिवाजीच्या मुलांना सुरेशचा राग होता. रात्री सुरेश मोटे हे घराबाहेर एकटे झोपले होते. त्यांना एक मुलगी व एक मुलगा असून, ते नव्यानेच पोलीस दलात दाखल झाले आहेत. ते नाशिक येथे कुंभमेळ्याच्या बंदोबस्ताला असल्यामुळे सुरेशची पत्नी गंगूबाई मुलांकडे नाशिकला गेली होती. त्यामुळे मयत सुरेश हे एकटेच घरी होते. झोपेतच त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून ठार मारल्यावर घरासमोरच त्यांना पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. सकाळी ८ च्या सुमारास शेजारील वस्तीवरील तरुण सुनील पोपट शिंदे हे शेताकडे जात असताना त्यांनी मृतदेह जळत असल्याचे पाहिले व ते सुरेश यांच्या घराकडे गेले. त्या वेळी मृतदेह अर्ध्यापेक्षा जास्त जळून गेला होता. शिरूरचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, रामदास वाकोडे घटनास्थळी दाखल होऊन, पंचनामा केला. (वार्ताहर)