शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गरिबी नष्ट होईल

By admin | Updated: February 11, 2017 02:55 IST

तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने होत असून, पुढील १० ते १५ वर्षांत अन्न, वस्त्र, निवारा, वाहतूक आदी गोष्टींवर होणारा खर्च कमी होणार आहे.

पुणे : तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने होत असून, पुढील १० ते १५ वर्षांत अन्न, वस्त्र, निवारा, वाहतूक आदी गोष्टींवर होणारा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे देशातील गरिबी नष्ट होईल, असा विश्वास प्रसिद्ध उद्योजक अरुण फिरोदिया यांनी शुक्रवारी व्यक्त केला. तसेच, समाजातील धर्म व जाती भेद मिटल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात फिरोदिया बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चाफेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, राजा ढाले, विद्या बाळ, मोहनराव देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन एकबोटे, डॉ. पी. डी. पाटील, विश्वनाथ कराड यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, महाविद्यालये व विद्यापीठ मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, वित्त व लेखा अधिकारी विद्या गारगोटे आदी उपस्थित होते.फिरोदिया म्हणाले, ‘‘समाजात आजही एकमेकांमध्ये वाद व दुरावा दिसून येतो. मात्र, तंत्रज्ञानाचा वेग कोणालाही थांबविता येणार नाही. परिणामी, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सामाजिक आणि आर्थिक स्थिरता येईल. त्यासाठी सर्वांनी तंत्रज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे. तसेच, परदेशात जाऊन लोकांची चाकरी करण्यापेक्षा देशातच रोजगारनिर्मिती केली, तर देश वैभवाच्या शिखरावर जाईल.’’बाबा आढाव म्हणाले, ‘‘विद्यापीठाने झोपडीत राहणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत ज्ञानाची ज्योत पोहोचविण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच, असंघटित कामगारांसाठी एक संस्था सुरू करायला हवी.’’अलीकडे राष्ट्रद्रोह हे कलम खूप सोपे झाले आहे. आम्हालाही ते लावले जाऊ शकते, अशी टीका करून विद्या बाळ म्हणाल्या, ‘‘भेदाभेद पाडणाऱ्या संस्कृतीला बाजूला सारून विद्यापीठाने माणसाला माणूस म्हणून वागणूक देणारे शिक्षण देण्यावर भर द्यावा.’’मनोहरराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. एकबोटे यांच्या वतीने डॉ. निवेदिता एकबोटे यांनी पुरस्कार स्वीकारला.(प्रतिनिधी)