शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

५१ गुंठे क्षेत्रांत ‘स्वीटकॉर्न’मधून साधली प्रगती

By admin | Updated: March 27, 2017 02:12 IST

गदी पिकांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील महेश अर्जुन डोके या तरुण शेतकऱ्याने

विकास शेटे /मंचरगदी पिकांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील महेश अर्जुन डोके या तरुण शेतकऱ्याने ५१ गुंठे क्षेत्रात स्वीटकॉर्न मका पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. मकापिकातून डोके यांना चांगले उत्पादन निघाले. १३० कट्टे उत्पादन निघाले असून मकेच्या ताटांचा उपयोग जनावरांच्या खाद्यासाठी झाला. मकेची ताटे विकून त्यातून त्यांनी चांगलेच पैसे मिळविले. याच शेतात डोके पुन्हा स्वीटकॉर्न मकापीक घेणार आहेत.वडगाव काशिंबेग येथील महेश अर्जुन डोके यांची वडगाव काशिंबेग तसेच सुलतानपूर या दोन गावांमध्ये शेती आहे. बाराही महिने पाण्याची व्यवस्था असल्याने व दोन्ही गावांजवळ घोडनदी गेल्याने वर्षभर नगदी पिके घेतली जातात. नोकरी करुन शेती करणाऱ्या डोके यांनी शेतात वेगवेगळे प्रयोग करुन विविध प्रकारची पिके घेतली आहेत. मात्र मागील वर्षी नगदी पिकांना बाजारभाव मिळाला नाही. अनेक पिकांचे भांडवल वसूल झाले नाही. त्यामुळे कमी खर्चात येणारी पिके घेण्याचा निर्णय डोके यांनी घेतला. सुलतानपूर येथील डोंगरावरची वावरं ही शेती नगदी पिकांसाठी उपयुक्त समजली जाते. या शेतीत ५१ गुंठे शेतात स्वीटकॉर्न मका पीक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.सुरुवातीला श्ेतात शेणखत टाकण्यात आले. दोन किलोचे दोन मका बी पुडे आणले. त्यासाठी ४६०८ रुपये खर्च आला. लागवडीनंतर वेळेवर पाणी भरणी करण्यात आली. भेसळ खताचा डोस देण्यात आला. तणनाशक मारले, मका पीक जोमदार आले. मका काढणीच्या वेळी कणीस फुगवणीसाठी पोटॅश व युरिया यांचा डोस देण्यात आला. मकापीक तिन महिन्यात निघते. मात्र कडाक्याच्या थंडीमुळे डोके यांच्या मकापिकाच्या उत्पादनासाठी जास्त दिवस लागले. उत्पानाला काहीसा उशीर होऊन ११२ दिवसात हे पीक निघाले.स्वीटकॉर्न मका पिकाला भांडवल कमी लागते तसेच मजुरी वाचत असल्याने शेतकऱ्यांना हे पीक परवडते. मका कणसांची तोडणी झाल्यावर शेतात शिल्लक राहिलेली मका ताटे विकण्यात आली. जनावरांच्या खाद्यासाठी या मके ताटांना चांगली मागणी होती. डोके यांची ताटे विकून त्यातूनही पैसे मिळविले. मका पिकाचे यशस्वी उत्पादन शेतकरी महेश डोके यांनी घेतले. वडील अर्जुन डोके, पत्नी छाया डोके, यांनी पीक घेण्यासाठी विशेष मदत केली. मका पीक काढून झाले असून याच ठिकाणी पुन्हा स्वीटकॉर्न मका पीकशेतकरी घेणार आहेत.