शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

एफडीए नोंदणीसाठी व्यावसायिक धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:18 IST

कायद्यानुसार सर्व लहान-मोठ्या व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) परवाना घेणे व नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी एफडीएकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेस व्यावसायिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

पुणे : कायद्यानुसार सर्व लहान-मोठ्या व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) परवाना घेणे व नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी एफडीएकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेस व्यावसायिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. फेब्रुवारी-मार्च या दोन महिन्यांत पुणे विभागातील ६ हजार ८५२ व्यावसायिकांनी नोंदणी केली असून २ हजार ८७६ व्यावसयिकांना परवान्याचे वितरण करण्यात आले आहे. त्यात पुणे विभाग आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.कायद्यातील तरतुदीनुसार फळविक्रेता, भाजीविक्रेता, मांस, अंडीविक्रेता, उपहारगृहे, मिठाई उत्पादक विक्रेते, वाईन, बिअर शॉप, पाणीपुरी, भेळविक्रेता, हॉटेल्स, बेकरी उत्पादक, आॅईल मिल आदींनी एफडीएकडे नोंदणी करणे व परवाने घेणे बंधनकारक आहे. परंतु, काही व्यावसायिकांकडून नोंदणी व परवाना घेण्याबाबत उदासीन होते.त्यामुळे एफडीएकडून १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार २४६ जगांना परवान्याचेवितरण करण्यात आले तर ३हजार ८०७ व्यावसायिकांनी नोंदणी करून घेतली.>महाराष्ट्र अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमने २०११ अंमलात आलेला असल्याने या कायद्यान्वये अन्न व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना अन्न व्यवसाय केल्यास संबंधितांवर फौजदारी खटला दाखल केला जातो. तसेच त्यांना ६ महिने कारावास व ५ लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी परवाना घ्यावा, असे आवाहन एफडीएतर्फे करण्यात आले होते. त्यास व्यावसायिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.- शिवाजी देसाई,पुणे विभागाचेएफडीएचे सहआयुक्त>एफडीएकडील परवाना व नोंदणीची आकडेवारी (फेब्रु.-मार्च)जिल्हा परवाना नोंदणीपुणे २,२४६ ३,८०७सातारा ३३२ ५५०सांगली ४० ४४९सोलापूर १४१ ६७८कोल्हापूर ११७ १,३६८एकूण २,८७६ ६,८५२