शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जैविक कचऱ्यापासून द्रवरूप खताची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:30 IST

मोठ्या शहरांमध्ये कचºयाच्या प्रश्नाने उग्र स्वरुप धारण केलेले असताना त्यावरील एक उपाय शोधण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने केले आहे.

पुणे : मोठ्या शहरांमध्ये कचºयाच्या प्रश्नाने उग्र स्वरुप धारण केलेले असताना त्यावरील एक उपाय शोधण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने केले आहे. तिने जैविक कचºयापासून दर्जेदार अशा द्रवरूप खताची निर्मिती करण्याचा उपाय शोधून काढला आहे.तिच्या या संशोधनाला राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठीय ‘अन्वेषण’ स्पर्धेत दुसºया क्रमांकाचे पारितोषिक अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील आर्टस सायन्स कॉमर्स महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात (एफवाय बीएस्सी) शिकणाºया चैताली पोपट क्षीरसागर हिने याबाबतचे संशोधन केले आहे. तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे आणि त्यांच्याकडे संशोधन करणारी विद्यार्थिनी ऐश्वर्या मारकड यांनी मार्गदर्शन केले. ती गेल्या सहा महिन्यांपासून या विषयावर काम करत आहे. तिच्या संशोधनात जैविक कचयापासून द्रवरूप खत तयार केले जाते. हे खत पिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. ते द्रवरूप असल्याने वापरण्यासाठीही सोयीचे ठरते. तसेच, कचºयाची समस्यासुद्धा आपोआप निकाली लागते.चैतालीने संशोधनाद्वारे कचरा जिरविण्यासाठी एक प्रक्रिया व उपकरण विकसित केले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या जैविक कचºयाचे (फळे, भाजीपाला, पालापाचोळा, हाडे, उरलेले अन्न) रूपांतर द्रवरूप खतात करणे शक्य होते. त्यासाठी केवळ आठवड्याभराचा काळ लागतो. त्यानंतरही साधारण ३० टक्के पदार्थ मागे उरतात. त्याचे एकाच दिवसात खतात रूपांतर करता येते. या प्रक्रियेत कचºयाचे तुकडे केले जातात. त्याच्यावर गरम पाण्याची क्रिया केली जाते आणि काही जिवाणू वापरले जातात. त्यामुळे ही क्रिया वेगाने घडून येते.राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठीय संशोधन, नावीन्यपूर्ण व उपयुक्त प्रकल्पांच्या सादरीकरणाची स्पर्धा याच आठवड्यात हरियानामधील अंबाला येथील चित्करा विद्यापीठात पार पडली. त्यामध्ये १५ राज्यांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.