शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चायनीज वांगीपिकाचे उत्पादन यशस्वी

By admin | Updated: September 12, 2016 02:14 IST

ग्रामीण भागात चायनीज वांगीपिकाचे यशस्वी उत्पादन घेण्याची किमया चिंचोडी देशपांडे येथिल शेतकरी राजू केशव शेवाळे यांनी साधली आहे.

विलास शेटे,  मंचरग्रामीण भागात चायनीज वांगीपिकाचे यशस्वी उत्पादन घेण्याची किमया चिंचोडी देशपांडे येथिल शेतकरी राजू केशव शेवाळे यांनी साधली आहे. ब्रिजल नागपुरी चिवचिव जातीच्या वांगीपिकाने शेतकरी शेवाळे यांना चांगलाच आधार दिला आहे.चिंचोडी देशपांडे येथील शेतकरी राजू केशव शेवाळे मोठ्या क्षेत्रात टोमॅटो पिकाचे उत्पादन घेतात. दरवर्षी चांगली साथ देणाऱ्या टोमॅटोपिकाने यावर्षी मात्र साफ निराशा केली आहे. टोमॅटो पिकाची चांगली काळजी घेऊनसुद्धा जेमतेम भांडवल वसूल झाले. टोमॅटो पिकातील अपयशानंतर शेतकरी राजू शेवाळे वांगीपिकाकडे वळले. ग्रामीण भागातील शेतकरी बहुधा काटेरी वांग्याचे पीक घेतात. मात्र या पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन चायनीज वांगीपिकाचे उत्पादन घेण्याचा निर्णय शेवाळे यांनी घेतला.राजू शेवाळे यांचा शेतातील उत्पादित माल मॉलला दिला जातो. या मॉलमधील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर चायनीज वांग्यांना चांगली मागणी व भाव असल्याची माहिती मिळाली. खुरपणी, औषध फवारणी, वेळेवर खताची मात्रा दिल्याने पीक जोमदार आले. जालिंदर निघोट, राजेंद्र अन्सीराम शेवाळे व नितीन शेवाळे यांनी पिकाबाबत मार्गदर्शन केले. दोन महिन्यांत पीक तोडणीस आले. सुरुवातीस वांगीपिकास २५ रु. किलो असा बाजारभाव मिळाला व शेवटपर्यंत तो तसाच टिकून राहिला. २३ तोडे वांगीपिकाचे झाले. सर्व माल मॉलमध्ये दिल्याने हमीभाव उपलब्ध झाला. वांगीपिकाला २५ हजार रुपये खर्च आला होता. खर्च वजा जाता पावणेदोन लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहिला आहे. चायनीज वांगी या भागात खाण्यासाठी वापरली जात नसली तरी मुंबईमधील हॉटेलमध्ये त्यांना चांगली मागणी असते. त्यामुळे पिकाचा बाजारभाव टिकून राहतो. राजू केशव शेवाळे यांच्या चायनीज वांगीपिकाला अनेक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांची पीक पद्धती इतर शेतकरी समजावून घेत आहेत. शेवाळे यांनी पुन्हा याच वांगीपिकाचे उत्पादन घेण्याचे ठरवले असून नुकतीच लागवड केली आहे.