शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या पाण्यावर प्रक्रिया

By admin | Updated: January 6, 2016 00:51 IST

शहरातील रस्त्यांवरून वाहत जाणारे पावसाचे पाणी अडवून त्यावर प्रक्रिया करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिकेच्या वतीने राबवण्यात येणार आहे.

पुणे : शहरातील रस्त्यांवरून वाहत जाणारे पावसाचे पाणी अडवून त्यावर प्रक्रिया करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिकेच्या वतीने राबवण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात स्थायी समितीच्या सभेत आज (मंगळवार) मंजुरी देण्यात आली.पावसाचे पाणी साठवण्यासाठीचे प्रकल्प करणाऱ्या इमारतींना पालिकेच्या वतीने मिळकतकरात सवलत दिली जाते. मात्र, रस्त्यावरून वाहणारे पाणी वायाच जाते. ते साठवून त्यावर प्रक्रिया करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम पालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंटस या संस्थेला दिले होते. नुकताच त्यांनी हा आराखडा पालिकेला सादर केला.या आराखड्यानुसार शहराचे क्षेत्र वेगवेगळ्या २३ पाणलोटांमध्ये विभागलेले आहे़ पाण्याचा निचरा करण्याचे काम तीन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बाणेर, वडगावशेरी, खराडी व वडगाव बुद्रुक या परिसरात काम होईल. दुसऱ्या टप्प्यात वारजे, बावधन, पाषाण, हडपसर, तिसऱ्या टप्प्यात मंगळवार पेठ, शनिवार पेठ, शहराचा उर्वरित भाग व धायरी क्षेत्र समाविष्ट आहे़ शहराच्या उपनगर परिसरात सध्या नाल्यांवर बांधकामे करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यात वाढ होऊ नये यासाठी प्राधान्याने त्या परिसरातील कामे सुरू करण्यात येतील.पावसाच्या या साठवलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मोठा प्रकल्प सुरू करण्याचा पालिकेचा विचार आहे. या कामाचा एकूण आवाका लक्षात घेऊन त्यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. या पाणलोट क्षेत्रात वेगाने विकासकामे चालू असून या भागातील नाल्यावर अतिक्रमणे होण्याची शक्यता लक्षात घेऊन कामे वेगाने सुरू करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)