पुणे : महापालिकेच्या सेवेत असताना १ जानेवारी, २०१६ नंतर निवृत्त झालेल्या सेवकांना, सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे़ याकरिता महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त विभागाने अशा सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याबाबतच्या सूचना सर्व खातेप्रमुख व महापालिकेच्या सहायक आयुक्तांना दिल्या आहेत.
महापालिकेच्या १५ हजार ७६ सेवकांसह, ३१ जानेवारी, २०१६ नंतर निवृत्त झालेल्या सुमारे आठशे ते एक हजार सेवकांना या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे़ यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर निवृत्त सेवकांच्या पेन्शनकरिता दरमहा २ कोटी रुपयांचा अधिकचा बोजा पडणार आहे़ या अनुंषंगाने प्रशासनाने ३१ जानेवारी, २०१६ पूर्वीचे निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारकांची सन २००६-२००९ च्या पेन्शन फरकाची माहिती संकलित करून, या सर्व निवृत्तीधारकांच्या प्रकरणांची तपासणी करण्याचे ठरविले आहे़ याकरिता महापालिकेच्या प्रत्येक विभागाने १ जानेवारी, २०१६ पूर्वीची मान्य पेन्शन प्रकरणे तातडीने पेन्शन विभागाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहे.
-------------------------