शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वेल्ह्यातही पुनर्वसनात अडचणी

By admin | Updated: December 19, 2014 02:03 IST

गुंजवणी प्रकल्पग्रस्तांचे वेल्ह्यातच पुनर्वसन करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. मात्र ज्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा सरकारचा विचार आ

मार्गासनी : गुंजवणी प्रकल्पग्रस्तांचे वेल्ह्यातच पुनर्वसन करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. मात्र ज्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा सरकारचा विचार आहे त्या जागेचा मालकाने (गुजर कुटुंबीयांनी) कोर्टात दावा दाखल केला असून, त्यावर उच्च न्यायालयाकडून स्थगिती आदेश घेतला आहे.जिल्हा प्रशासनाने गुंजवणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावले उचलली आहेत. धरण पूर्ण क्षमतेचे झाल्यास धरणाच्या फुगवट्यात जाणाऱ्या घराचे पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. यातील ८५ प्रकल्पग्रस्तांना धरणाच्या खालील बाजूस घरासाठी प्लॉट व तेथूनच पुढे आठ किलोमीटर अंतराच्या आत शेतीसाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्या जागेवर सरकार हे पुनर्वसन करू पाहत आहे, तो मालकच न्यायालयात गेला आहे.याबाबत मालक हेमंत गुजर यांच्याशी ‘लोकमत’ने चर्चा केली असता, आमची जमीन गेल्यावर आमचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. धरणाखालची जमीन अद्याप आम्ही कसत आहोत. त्यावरच आमचा उदरनिर्वाह चालू आहे. आमची जमीन धरणासाठी घेतल्यावर त्यावर बुडीत क्षेत्रात जाणारी जमीन असा उल्लेख आहे. मात्र, पुनर्वसनाच्या नियमानुसार बुडीत क्षेत्रातील जमीन पुनर्वसनासाठी वापरात येऊ शकत नाही. असे असताना या ठिकाणी गावठाण कसे वसवले जाऊ शकते? शिवाय ज्या ८५ खातेदारांना येथे प्लॉट दिले जाणार आहेत त्यांना शिरूर व दौंड तालुक्यात जमिनी, घरे दिली गेली आहेत. त्या ठिकाणी नवे गाव वसवण्यात आले आहे. शासनाने एवढा केलेला खर्च तसाच सोडून या ठिकाणीच पुनर्वसनाचा हट्ट का, असा त्यांनी केला. (वार्ताहर)