शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उजनीकाठी ‘पक्षीपे्रमीं’ची वाळूव्यावसायिकांनी केली अडचण

By admin | Updated: January 11, 2016 01:37 IST

उजनी जलाशयामध्ये कुंभारगाव, डिकसळ या परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाल्याने हे पक्षी पाहण्यासाठी दूरदूरचे पर्यटक

पळसदेव : उजनी जलाशयामध्ये कुंभारगाव, डिकसळ या परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाल्याने हे पक्षी पाहण्यासाठी दूरदूरचे पर्यटक, पक्षीप्रेमी गर्दी करीत आहेत. रविवारी (दि. १०) राज्यभरातून पर्यटकांनी सुटीमुळे पक्षिदर्शनाचा आनंद लुटला. त्यामुळे ‘उजनीकाठी - पर्यटकांची मांदियाळी’ असे चित्र सध्या दिसत आहे. परंतु, वाळूमाफियांनी वाळूसाठी खोदलेले खड्डे, वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे खराब झालेला रस्ता यामुळे पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.सध्या उजनी जलाशयाच्या कुंभारगाव, डाळज, डिकसळ या भागात प्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांसह अनेक विविध जातींच्या पक्ष्यांनी गर्दी केली आहे. त्यामुळे हे पक्षी उजनीच्या गतवैभवात भर पाडत आहेत. त्यातच पक्षी पाहण्यासाठी येणारे पर्यटक, पक्षिमित्र, पक्षिप्रेमी यांना कुंभारगाव येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत राहण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने पर्यटक पक्षी पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. रविवारी तर उजनीलगत अनेक पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे उजनीचा परिसर गजबजून गेला. ठाणे, मुंबई, पुणे या ठिकाणाहून पर्यटक पक्षी पाहण्यासाठी येत होते.अनेक पर्यटकांना तर फ्लेमिंगो पक्ष्यांची छबी गुलाबी रंग, उंच मान, लांब पाय, लांब चोच, असे वर्णन असलेले फ्लेमिंगो (रोहित) पक्षी पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सैबेरिया या देशातून त्यांचे होत असलेले आगमन व दूरचा प्रवास हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.मात्र, उजनीच्या पात्रात बेकायदा वाळूउपसा सुरू असल्याने जुने भिगवण ते जुने डाळज या रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. जुने डाळज येथील पुलाच्या ठिकाणी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्ता खचल्याने पर्यटकांना आपल्या गाड्या लांब लावाव्या लागत आहेत. त्यातच रस्त्यालगत वाळूउपसासाठी खोदलेले मोठे खड्डे यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)