शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

समस्यांचे बसथांबे!

By admin | Updated: October 15, 2015 00:52 IST

ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले बहुतांश बसथांबे मोडकळीस आले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रशासनाने दुर्लक्षित केलेल्या बसथांब्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे.

ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले बहुतांश बसथांबे मोडकळीस आले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रशासनाने दुर्लक्षित केलेल्या बसथांब्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे. अनेक बसस्थानक परिसरात स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधा नाही. ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण करण्यासाठी महामंडळ अपयशी ठरले आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असणारे महामंडळ प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. ‘लोकमत’ने गावोगावच्या बसस्थानकांचा घेतलेला आढावा...डोर्लेवाडी : झारगडवाडी, डोर्लेवाडी, गुणवडी या गावांमधील प्रवाशांना बस स्थानकाची सोय नसल्याने भरउन्हामध्ये व पावसामध्ये थांबावे लागते. बारामती-कळंब हा तीर्थक्षेत्रासाठी जाणारा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर रहदारी जास्त असते. तीर्थक्षेत्रासाठी जाणाऱ्या बसची सोयसुद्धा आहे. परंतु, झारगडवाडी, डोर्लेवाडी, गुणवडी या गावांमध्ये प्रवाशांना थांबण्यासाठी बस स्थानक नसल्याने भरउन्हामध्ये, तसेच पावसाळ्यात पावसामध्ये उभे राहावे लागते. प्रवासी झाडाच्या सावलीत बाजूला उभा राहिला, तर बस दिसत नाही. चालक थांब्यावर कोणी नसल्याने बस न थांबवता जातात, असे अनेक वेळा घडले आहे. भरउन्हामध्ये, पावसामध्ये उभे राहावे लागते. यासाठी वरील सर्व ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर बस स्थानकाची सोय करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.याअगोदर पदाधिकाऱ्यांनी ते केले नाही. माझा सरपंचपदाचा दोन महिन्यांचा कालावधी राहिला आहे, असे सांगितले. झारगडवाडीच्या सरपंच अनिता लांडगे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बस स्थानक बांधलेले आहे. हे बस स्थानक चौकाच्या बाहेर आहे. तिथे बसण्यासाठी कुठलाच प्रवासी जात नाही. ते बांधून काय उपयोग? जिथे बसची वाट पाहत प्रवासी थांबतात तिथे बस स्थानक नाही. वरील गावांमध्ये बस स्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.-नामदेव लाड, सरपंच, गुणवडी