शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आराखड्याच्या अडचणी वाढल्या

By admin | Updated: December 14, 2015 00:36 IST

स्मार्ट सिटी आराखड्याला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, रिपाइं या राजकीय पक्षांसह विविध संस्था व सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला आहे

पुणे : स्मार्ट सिटी आराखड्याला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, रिपाइं या राजकीय पक्षांसह विविध संस्था व सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. स्मार्ट सिटीबाबतची मुख्यसभा सुरू असतानाच ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी आराखडा मंजुरीच्या अडचणी वाढल्या आहेत.स्मार्ट सिटी आराखड्यातील स्पेशल पर्पज व्हेईकलच्या (एसपीव्ही) तरतुदीला नगरसेवकांचा प्रचंड विरोध आहे. ही अट वगळण्याची उपसूचना मांडल्याशिवाय स्मार्ट सिटी आराखडा मंजूर होणे अवघड आहे. त्याचबरोबर या उपसूचनेसह स्मार्ट सिटी आराखडा मंजूर झाला, तर स्पर्धेमध्ये पुण्याच्या प्रस्तावाचा विचार होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे एकंदरीतच पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाचे भवितव्य अडचणीत सापडले आहे.कॉँग्रेस पक्षाचा निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चेनंतरपुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पातून होणाऱ्या विकासाला विरोध नाही, मात्र आराखड्यातील स्पेशल पर्पज व्हेईकलमुळे (एसपीव्ही) महापालिकेची स्वायत्तता धोक्यात येणार असल्याचा आक्षेप काँग्रेसच्या नगरसेवकांनी रविवारच्या बैठकीमध्ये उपस्थित केला. त्यामुळे आराखड्याबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून घेतला जाईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेमध्ये सोमवारी स्मार्ट सिटी आराखड्याबाबत राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुख्यसभा होणार आहे. यासंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची रविवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी स्मार्ट सिटी आराखड्यावर सडकून टीका केली. आयुक्तांनी महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा राज्य शासनाकडून निर्देश आणून मुख्यसभा घ्यायला लावल्याने या वेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. एसपीव्हीमुळे महापालिकेची स्वायत्तता धोक्यात येऊ नये, अशी आग्रही भूमिका नगरसेवकांनी मांडली.