शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका
2
मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, DCM शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग
3
"मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे आम्ही सकारात्मकपणे बघतोय, पण..."; फडणवीसांनी सांगितला नेमका पेच!
4
मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त
5
वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले
6
अबब! किराणा दुकानदाराला १४१ कोटींची टॅक्स नोटीस; तपासात समोर आला धक्कादायक प्रकार 
7
158 KM रेंज अन् स्मार्ट फिचर्स; TVS ने लॉन्च केली आपली नवीन EV स्कूटर, किंमत फक्त...
8
अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार, ६२२ जणांचा मृत्यू; गावे उद्ध्वस्त, इमारती ढिगाऱ्यात बदलल्या
9
"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना
10
Thane Accident: कंटेनरची मेट्रोच्या वाहनाला धडक; चालक अडकला; अर्ध्या तासाने सुटका
11
बाजाराला 'ट्रम्प टॅरिफ'च्या धक्क्यातून दिलासा! इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' क्षेत्रात तेजी, कुठे झाली घसरण?
12
दरवाजाला कुलूप, प्रियकराला आत लपवलं; महिला कॉन्स्टेबलचं बिंग फुटलं, पोलीस पतीनं लई धुतलं...
13
Raigad: आदिवासी कुटुंबाला मारहाण, मुलीसोबत गणपती दर्शनाला गेल्याचा काढला वचपा; ९ जणांना अटक
14
"कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण...", प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रार्थना बेहरेची भावुक पोस्ट
15
'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ..'; पंतप्रधान मोदी यांचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र
16
सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर
17
"मूर्खांना म्हणी पण कळत नाहीत"; अमित शाहांवरील वादग्रस्त विधानानंतर महुआ मोईत्रांची पुन्हा टीका
18
"तुम्ही फार मोठे लोक आहात, तुम्हाला कुणी...", विमानतळावर नेमकं कुणाला काय म्हणाला रोहित शर्मा? VIDEO व्हायरल
19
Maratha Kranti Morcha: मुंबई महानगरपालिकेचे ८०० कर्मचारी पहाटे ३ वाजेपासून स्वच्छता मोहिमेवर!
20
Maratha Reservation: नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी

खासगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी : पणन मंत्री जयकुमार रावल

By अजित घस्ते | Updated: May 10, 2025 18:30 IST

​​​​​​​परवाना देताना लावून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या खासगी व थेट बाजार यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी

पुणे : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीव्यतिरिक्त १०५ खासगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खासगी व थेट बाजाराबाबत शेतमाल विक्री सुविधा संदर्भात तक्रारी आहेत. खासगी बाजारात खरेदी-विक्री शेड, बाजार ओटे, गोडाऊन, रस्ते यासह पायाभूत सुविधांची तपासणी करण्यात यावी. तसेच त्यांचे खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्या.परवाना देताना लावून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या खासगी व थेट बाजार यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. तसेच बाजारात व्यवहार पारदर्शक नसलेल्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत. तसेच सर्व खासगी व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

गुलटेकडी मार्केट यार्ड पणन कार्यालयात पणन संचालनालयाची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पणन संचालक विकास रसाळ, उपसंचालक मोहन निंबाळकर, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, सचिव डॉ. राजाराम धोंडकर आदी उपस्थित होते.

यावेळी रावल म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीसह खासगी व थेट बाजारात शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना २४ तासांच्या आत ऑनलाइन पद्धतीने किंवा इतर मान्य पद्धतीने देण्यात यावे. तसेच शेतमाल विक्रीचे पैसे अडवून ठेवलेल्या परवानाधारकांवर परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांची शेतमाल विक्री हक्काची सनद प्रत्येक बाजार समितीत लावा, शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीची त्यांना माहिती व्हावी. यासाठी शेतकरी हक्काची सनद प्रत्येक बाजार समितीत लावा, असेही अधिकाऱ्यांना सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड