शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

खासगींना रेड कार्पेट, सरकारी कंपनीचा दुस्वास

By admin | Updated: May 26, 2017 06:22 IST

खासगी केबल कंपन्यांवर रस्ते खोदाईसाठी सवलतींचा वर्षाव करीत असलेल्या महापालिका प्रशासनाने सरकारी कंपनी असलेल्या महावितरणला (राज्य वीज महामंडळ) मात्र

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : खासगी केबल कंपन्यांवर रस्ते खोदाईसाठी सवलतींचा वर्षाव करीत असलेल्या महापालिका प्रशासनाने सरकारी कंपनी असलेल्या महावितरणला (राज्य वीज महामंडळ) मात्र त्यांच्या रस्तेखोदाईसाठी सतराशे साठ अटी-शर्ती टाकून जखडून टाकले आहे. यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.महावितरण कंपनीने रस्ते खोदाईसाठी महापालिकेकडे प्रस्ताव दिला आहे. त्यांना एकूण ४०० किलोमीटर लांबीची रस्तेखोदाई त्यांच्या केबल टाकण्यासाठी करायची आहे. अन्य कंपन्यांसाठी महापालिकेच्या वतीने अशा कामासाठी प्रति रनिंंग मीटर ५ हजार ५४७ रुपये दर आकारण्यात येतो. महावितरणसाठी या दरात सवलत देण्याचा ठराव पूर्वी मंजूर झाला आहे. त्यांना २ हजार ३५० रुपये प्रति रनिंग मीटर दर आकारण्यात येतो; मात्र ही सवलत वगळता अन्य अटी मात्र प्रशासनाने त्रासदायक ठरतील अशाच टाकल्या आहेत.रस्तेखोदाईनंतर त्याची दुरुस्ती महावितरणकडून करण्यात येणार आहे. तसाच प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे; मात्र त्यामुळे महापालिकेला त्यासाठी आकारता येणारी रक्कम त्यांच्याकडून घेता येणार नाही. त्यावर प्रशासनाने नामी उपाय शोधला आहे. केबल टाकून झाल्यानंतर महावितरण करणार असलेल्या रस्तेदुरुस्तीच्या कामावर (रिइन्स्टेटमेंट वर्क) महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुपरव्हिजन करावे लागणार आहे. या सुपरव्हिजन कामाबद्दल महावितरणने पालिकेला ११ टक्के रक्कम शुल्क म्हणून द्यावी, अशी अट आहे. हे ११ टक्के पालिका खासगी कंपन्यांना रस्तेखोदाईसाठी आकारत असलेल्या प्रति रनिंग मीटर ५ हजार ५४७ रुपये शुल्कावर आहेत.