शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कैदी म्हणतात, बाहेर नको रे बाबा, कारागृहातच बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST

विवेक भुसे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग असताना कारागृह मात्र दुसऱ्या लाटेत जवळपास कोरोनामुक्त राहिला ...

विवेक भुसे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग असताना कारागृह मात्र दुसऱ्या लाटेत जवळपास कोरोनामुक्त राहिला आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर कोणत्याही आस्थापनांपेक्षा कारागृहातील अधिकारी, कर्मचारी तसेच कैद्यांचे लसीकरण अतिशय वेगाने झाले आहे. त्यामुळे बाहेर जाण्यापेक्षा कारागृहातच राहणे कैदी पसंत करीत आहेत. तातडीचा पॅरोल मिळाला असतानाही ५३ गुन्हेगारांनी पॅरोल नाकारून कारागृहात राहणे पसंत केले असल्याचे राज्याचे अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी सांगितले.

कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशभरात महाराष्ट्र सर्वाधिक त्रस्त आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्याचा फटका सुरुवातीला राज्यातील कारागृहांना बसला होता. त्याचा कारागृह प्रशासनाने यशस्वी मुकाबला केला. या अनुभवातून शिकत कारागृह प्रशासनाने दुसऱ्या लाटेच्या काळात सुरुवातीपासूनच कडक उपाय राबविले. त्यातून आज राज्यातील कारागृहात कैद्यांमध्ये फक्त ७७ सक्रिय रुग्ण असून, १४ कर्मचारी बाधित आहेत.

राज्यातील कारागृहात दुसऱ्या लाटेला थोपविण्याचे काम केवळ लसीकरणच करू शकेल, असे लक्षात घेऊन सुनील रामानंद यांनी कालबद्ध लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. राज्यभरातील सर्व कारागृहात मिळून जवळपास ३४ हजार कैदी व कच्चे कैदी आहेत. त्यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. कारागृहातील तब्बल २१ हजार कैद्यांचे आतापर्यंत लसीकरण झाले आहे. त्याचबरोबर कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ९५ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. कोणत्याही सरकारी आस्थापनेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले नाही.

कारागृहातून कधी एकदा सुटका होते, याकडे गुन्हेगारांचे लक्ष असते. त्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. मात्र, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. राज्यातील कारागृहात मिळणारे चांगले जेवण, आरोग्य सुविधा आणि लसीकरण यामुळे बाहेरच्या वातावरणापेक्षा कैद्यांना अधिक सुरक्षित वातावरण कारागृहात असल्याचे जाणवते. गुन्हेगारांना पॅरोल मंजूर झाला असतानाही बाहेर कोरोनाचा संसर्ग व इतरही अनेक अडचणी जाणविल्याने ५३ जणांनी पॅरोल नाकारून कारागृहातच राहणे पसंत केले आहे. कारागृहाने राबविलेल्या उपाययोजनांचेच हे यश आहे.

उच्च न्यायालयाने केले कौतुक

कोरोना संसर्गावर काय उपाययोजना केल्या याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावेळी शासनाने केलेल्या उपाययोजना आणि लसीकरण याची माहिती न्यायालयाला दिली. त्यावेळी उच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनाने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. कारागृहाने करून दाखविले म्हणून मान्य केले, असे सुनील रामानंद यांनी सांगितले.