शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अंदाजपत्रकातही सुरक्षेलाच प्राधान्य

By admin | Updated: February 3, 2016 00:51 IST

अंदाजपत्रकासाठी नागरिकांनी १० लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन महापालिकेने केले होते. यामध्ये अनेक नागरिकांनी सुरक्षिततेला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे

पिंपरी : अंदाजपत्रकासाठी नागरिकांनी १० लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन महापालिकेने केले होते. यामध्ये अनेक नागरिकांनी सुरक्षिततेला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे. अंदाजपत्रकासाठी आलेल्या सूचनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत अधिकाधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या अंदाजपत्रकासाठी नागरिकांनी दहा लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन महापालिकेने केले होते. त्यानुसार महापालिकेने दिलेल्या मुदतीत ३३४ सूचना प्राप्त झाल्या. यामध्ये १६५ स्वीकारण्यात आल्या, तर १६९ नाकारण्यात आल्या. सूचना देण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत होती. मुदतीत नागरिकांना ज्या त्या क्षेत्रीय कार्यालयात लेखी कामे सुचविता येतील, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी आपल्या सूचना दिल्या. यातील योग्य सूचनांचा समावेश आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात केला जाणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने २००७-०८ या आर्थिक वर्षांपासून नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा अंदाजपत्रकात अंतर्भाव केला जात आहे. त्यानुसार अंदाजपत्रक तयार करताना नागरिकांकडून सूचना मागविण्यात येतात. अंदाजपत्रक लोकाभिमुख व्हावा, या दृष्टीने नागरिकांकडून अंदाजपत्रकासाठी सूचना मागविण्याचा उपक्रम महापालिकेकडून राबविला जात आहे. यासाठी सहा ठिकाणी जनसभा घेण्यात आल्या.नाकारण्यात आलेल्या बऱ्याचशा सूचना अशा आहेत की, ज्यासाठी पालिकेने अगोदरच अंदाजपत्रकात तरतूद केलेली आहे, तर काही सूचनांमध्ये जागा ताब्यात नसणे, प्रकरण न्यायप्रविष्ट असणे, अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी होत्या. काही सूचना देण्यापूर्वीच ते काम पूर्ण झाले आहे, अशाही कामांचा नाकारण्यात आलेल्या सूचनांमध्ये समावेश आहे. त्यामुळे काही सूचना नाकारल्या आहेत.(प्रतिनिधी)‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वाधिक १४२ सूचना प्राप्त झाल्या. यातील ८७ सूचना स्वीकारण्यात आल्या, तर ५५ सूचना नाकारण्यात आल्या. ‘ड’ कार्यालयांतर्गत सहा सूचना प्राप्त झाल्या. त्या सर्व स्वीकारण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिकांकडून विरंगुळा केंद्र व उद्यान उभारणी करण्याबाबत अधिकाधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत. तर तरुण वर्गाकडून वाचनालय उभारण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. रस्ते, पदपथ, आरोग्य, रस्त्यावरील गतिरोधक, उद्याने आदींबाबत सूचना मांडण्यात आल्या. महापालिकेने दिलेल्या या संधीमुळे नागरिकांना विविध कामे सुचविता आली.