शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एफएसआय आणि स्लम टीडीआर वापराचा प्राधान्यक्रम निश्चित करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाने मंजुरी दिलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील तरतुदीनुसार हस्तांतरणीय विकास हक्क (एफएसआय) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शासनाने मंजुरी दिलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील तरतुदीनुसार हस्तांतरणीय विकास हक्क (एफएसआय) आणि स्लम टीडीआर वापराचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात यावा. जेणेकरुन झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अधिक गतीने मार्गी लागतील असे पत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने पुणे महापालिकेला पाठविले आहे.

या नियमावलीनुसार हस्तांतरणीय विकास हक्काद्वारे विकास योजनेतील सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित जागा ताब्यात घेण्याबाबतची नियमावली नमूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार दाट लोकवस्ती असलेल्या क्षेत्रासाठी ‘फ्लोअर स्पेस इंडेक्स’ची तसेच बिगर दाट लोकवस्ती क्षेत्राबाबत अनुज्ञेय एफएसआयची तरतूद आहे. बांधकाम क्षेत्रासाठी अतिरीक्त जागेचा एफएसआय जादा दर आकारून अनुज्ञेय केला आहे. शासनाकडून कोणताही प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आलेला नाही. तसेच अनुज्ञेय टीडीआर मधील ३० ते ५०टक्के स्लम टीडीआर/ अ‍ॅमेनिटी टीडीआर/युआरटीच्या वापराचा देखील प्राधान्यक्रम निश्चित केलेला नाही.

पालिका विकास आराखड्यातील विविध आरक्षणे विकसित करावयाची झाल्यास त्यासाठी जमिन मालकांना आर्थिक मोबदला देण्याऐवजी टीडीआर/एफएसआय स्वरूपात मोबदला देणे महापालिकेस आर्थिक दृष्ट्या अधिक परवडते. शासनाने मंजूर केलेल्या नियमावलीमधील तरतुदी लागू झाल्यास शहरातील बांधकाम प्रकल्पांसाठी अधिमूल्यावर आधारीत एफ एफआयचा आधी वापर केला जाईल. त्याचा टीडीआरच्या मागणीवर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होणार आहे.

शहरातील सुमारे ४५० हून अधिक झोपडपट्यांच्या पुर्नविकासावर देखील बांधकाम नियमावलीमधील तरतुदींचा विपरीत परिणाम होणार आहे. चालू असलेले व भविष्यातील नियोजित सर्व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प टीडीआरवर अवलंबून आहेत. टीडीआरच्या मागणी व दरामध्ये घट झाल्यास हे प्रकल्प आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासियांचे हक्काचे घर मिळण्याचे स्वप्न तसेच शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचे धोरण देखील कागदावरच राहणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरे ही संकल्पनाही अडचणीत येईल.

पुणे महापालिकेने पिंपरी चिंचवड पालिकेप्रमाणे अधिमूल्यावर आधारित एफएसआय वापरण्यापुर्वी अनुज्ञेय असणारा संपुर्ण टी.डी.आर. सर्वप्रथम प्राधान्याने व पुर्ण क्षमतेने वापरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी असे प्राधिकरणाने म्हटले आहे.