शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीत होमगार्डला प्राधान्य द्या

By admin | Updated: March 28, 2015 23:48 IST

पोलीस भरतीत सर्वांत प्रथम होमगार्ड यांना प्राधान्य देऊन त्यांच्या मानधनात वाढ केली पाहिजे,’’ असे मत माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केले.

दौंड : ‘‘पोलीस भरतीत सर्वांत प्रथम होमगार्ड यांना प्राधान्य देऊन त्यांच्या मानधनात वाढ केली पाहिजे,’’ असे मत माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केले. दौंड येथील प्रशासकीय इमारतीत होमगार्ड कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. थोरात म्हणाले, पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड काम करीत असतो. परिणामी, तो समाजाची सेवा करतो. त्यामुळे होमगार्डच्या अडीअडचणी शासनाने तातडीने सोडविल्या पाहिजेत. समाजातील सर्व स्तरातील मंडळींनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री यांनी प्रशासकीय इमारतीला जागा आणि शासनाचा निधी दिल्यामुळेच याठिकाणी भव्य वास्तू उभारली. या वेळी जिल्हा समादेशक दीपक जांभळे, प्रभारी नगराध्यक्ष योगेश कटारिया, अप्पासाहेब पवार, विवेक संसारे, रवी पवार, अशोक मुनोत, रवींद्र जाधव, प्रवीण आहुजा, विनायक विखरणकर यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी नायब तहसीलदार उत्तम बढे, डॉ. प्रेमकुमार भट्टड, आबा वाघमारे, अ‍ॅड. विलास बर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, अ‍ॅड. विलास बर्वे यांनी होमगार्ड कार्यालयाला संगणक भेट दिले. विकास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश बनसोडे यांनी आभार मानले. ४गेल्या अनेक वर्षांपासून एका छोट्या खोलीत होमगार्डचे कार्यालय कार्यरत होते. मात्र, आता त्यांना प्रशासकीय इमारतीत भव्य जागा मिळाल्याने होमगार्ड आणि त्यांचे अधिकारी आनंदित होते. ४दरम्यान, तत्कालीन आमदार रमेश थोरात यांच्या अथक प्रयत्नातून ही इमारत उभी राहिल्याने कार्यक्रमात प्रत्येक भाषणकर्त्याने रमेश थोरात यांच्या नावाचा उल्लेख माजी आमदार न करता आमदार रमेश थोरात असा करत होते. तेव्हा कार्यक्रम झाल्यानंतर सध्या ते माजी आमदार आहेत. मात्र, आपण त्यांच्या नावापुढे आमदार ही उपाधी लावली, असे भाषणकर्त्यांना बोलले तेव्हा सर्वच म्हणाले कामाला महत्त्व आहे. पदाला महत्त्व नाही. ४या वेळी होमगार्डचे जिल्हा समादेशक दीपक जांभळे म्हणाले, की आम्ही पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो. तेव्हा आमच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला विविध क्षेत्रांतील आणि विविध शासकीय अधिकारी उपस्थित आहेत. परंतु पोलीस अधिकारी किंबहुना एकही उपस्थितीत नाही, ही मनाला चटका लावणारी बाब आहे.