शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

छापील साहित्य कुजतेय!

By admin | Updated: February 9, 2015 04:04 IST

जकात आकारणी सुरु असताना विविध कामांसाठी लागणारी पावती पुस्तके, रजिस्टर, प्रतिज्ञापत्र, खतावली आदी स्टेशनरीची छपाई केली होती.

सुवर्णा नवले, पिंपरीजकात आकारणी सुरु असताना विविध कामांसाठी लागणारी पावती पुस्तके, रजिस्टर, प्रतिज्ञापत्र, खतावली आदी स्टेशनरीची छपाई केली होती. मात्र, एलबीटी लागू झाल्यामुळे या पावती पुस्तकांचा सर्व साठा फु गेवाडी येथील जकातनाका येथील गोदामात धूळखात आहे. लाखों रूपयांचे हे साहित्य कुजण्याच्या मार्गावर आहे. महापालिकेच्या अनेक विभागांना विविध स्टेशनरीची वारंवार गरज पडत असते. मात्र, पालिकेला लागणारे स्टेशनरी साहित्य वेळेनुसार उपलब्ध होत नाही. मात्र जकातीचे साहित्य अथवा विविध ठिकाणी वापरात नसलेले विविध रद्दी अथवा भंगार स्वरुपातील साहित्य पडून आहे. यामुळे महापालिकेचे हे साहित्य चोरीला जाण्याचे अथवा परस्पर विक्रीचे प्रकार घडून येत आहेत. या सर्व वस्तुंच्या निविदा मंजूर होणे बाकी आहे. पावती पुस्तकांचा साठा कुजल्यानंतर याचा काही उपयोग होणार नाही. यावर कोणतीही निविदा अद्याप पालिकेच्या वतीने काढलेली नाही. याकडे प्रशासनाची डोळेझाक होत आहे. जकात बंद होऊन जवळपास एक वर्ष होत आलेले आहे. मात्र, या जकातीला लागणारी स्टेशनरी व प्रिटिंग साहित्यावर अद्यापही काही निर्णय घेतलेला नाही. कर्मचारी डस्टबिन वाटपासाठी गेले असल्यामुळे माहिती देण्याकरिता कोणी उपलब्ध नाही. याचा लेखाजोखा शोधावा लागेल. अथवा शिल्लक साठा मोजावा लागेल, असे एलबीटी विभागाच्या वतीने सांगितले. जकातीची उपलब्ध विविध पुस्तके याविषयी झालेला खर्च व आकडेवारी याबद्दल कोणत्याही प्रकारचे रेकॉर्ड स्थानिक संस्था कर विभागाकडे उपलब्ध नाही. फुगेवाडी जकात विभागात गोदामाच्या कामाकरिता एक क्लार्क व शिपायाची नेमणूक केली होती. मात्र, या शिल्लक साहित्याचे कोणत्याही प्रकारचे लेखी स्वरूपात आकडेवारी उपलब्ध नाही. जागा अडकून पडलेली आहे.शहरातील एकूण २६ ठिकाणी जकात नाके कार्यरत होते. शासन निर्णयानुसार जकात बंद करून १ एप्रिल २०१३ पासून एलबीटी लागू करण्यात आली. फुगेवाडी येथील जकात नाका या ठिकाणी जकातीच्या प्रिंटींग साहित्याचे गोदामात आहे. जकातीचे सामान ठेवण्यासाठी या गोदामचा वापर केला जात आहे. यामध्ये काही छपाई साहित्य एलबीटीचे आहे. जकातीच्या प्रिटिंग साहित्यामध्ये एस्कॉर्ट पावती पुस्तके (परगमन शुल्क), प्री पास पावती, रहदारी , डिपॉझिट पावती पुस्तक, चार बारा फ ॉर्म, खतावली बिल पुस्तके, प्रतिज्ञापत्र, संगणक पावत्या आदी विविध प्रकारचे साहित्य या ठिकाणी पडून आहे. या सर्व पावती पुस्तकांचे कामकाज मार्च २०१३ पासून पूर्णपणे बंद झालेले आहे. महापालिकेने जकातीच्या साहित्यावर लाखो रुपयांमध्ये खर्च केलेला आहे. एलबीटीचा निर्णय अंमलात येणार होता तर एवढी पुस्तके छपाईसाठी गेली कशी हा प्रश्न निर्माण झालेला आहे. जकातीसाठी लागणारे छपाई साहित्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होणार नाही. याचा इतर कामांसाठी पुनर्वापर करणे अशक्य बाब आहे. याकरिता महापालिकेला जकातीच्या छपाई साहित्याची पूर्णपणे रद्दी करावी लागणार आहे. लाखोंच्या मालाची किंमत काही हजार रुपयांवर येणार आहे.