शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग मसाज सेंटरवर छापा

By admin | Updated: November 26, 2014 00:18 IST

तीन तरुणींसह पाचजणांना अटक-सेंटरच्या महिला व्यवस्थापका रेखा मनोज बोईन (वय ३२, मूळ गाव वारजे, पुणे),

कोल्हापूर : मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या मिरजकर तिकटी परिसरातील निसर्ग मसाज सेंटरवर जुना राजवाडा पोलिसांनी आज, मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास छापा टाकला. या सेंटरच्या महिला व्यवस्थापकासह दोघांना अटक केली. व्यवस्थापक रेखा मनोज बोईन (वय ३२, रा. सरस्वती कॉलनी, उचगाव, ता. करवीर, मूळ गाव वारजे, पुणे), एजंट शिवाजी आनंदा गुरव (३८, रा. मानोळेवाडी, ता. भुदरगड) अशी त्यांची नावे आहेत. पीडित तीन तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली. मसाज सेंटरचा मालक दीपक बाबूराव सपाटे (रा. लक्षतीर्थ वसाहत) हा पसार झाला. मिरजकर तिकटी परिसरातील बालगोपाल तालीमसमोरील गुरुमहाराज वाड्याजवळील इमारतीमधील निसर्ग मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी महिला पोलीस अधिकारी स्मिता काळभोर यांना कारवाईचे आदेश दिले. काळभोर यांनी पथकासह या सेंटरमध्ये छापा टाकला असता कुंटणखाना सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी रेखा बोईन व एजंट शिवाजी गुरव यांच्यासह तीन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची कबुली दिली. पोलीस अधिकारी काळभोर यांनी स्वत: फिर्याद देऊन अनैतिक व्यापार प्रतिबंधक कलमानुसार गुन्हा दाखल केला. पीडित तरुणी या शिवाजी पेठ, राजारामपुरी व जालना जिल्ह्यांतील आहेत. मसाज सेंटरचा मालक मात्र कारवाईची चाहूल लागताच पसार झाला. रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्याचे पोलिसांचे प्रयत्न होते. (प्रतिनिधी) मसाज कमी, वेश्या व्यवसायच जास्तकॅन्डल लाईटमध्ये मसाज, स्पेशल रुम्स, एकदा जरुर आनंद घ्या, अशा वृत्तपत्रांत जाहिराती देऊन ही मसाज केंंद्रे शहराच्या सर्वच भागात राजरोसपणे सुरू आहेत. त्याचे दरही भरमसाठ आहेत. त्यातील कांही मोजकी केंद्रेच मसाज करतात. इतर ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असतो; परंतु त्यावर कुणीच कारवाई करत नसल्याचे चित्र होते. राजवाडा पोलिसांनी ही पहिलीच कारवाई केली.