शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: February 15, 2016 02:48 IST

मेक इन इंडियाच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवनवीन कारखान्यांच्या फिती कापण्यास वेळ आहे; परंतु देशभरात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या

पुणे : मेक इन इंडियाच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवनवीन कारखान्यांच्या फिती कापण्यास वेळ आहे; परंतु देशभरात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसल्याची टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली़ राष्ट्रीय मजदूर संघाच्या कामगार मेळाव्याप्रसंगी रविवारी काँग्रेस भवनात नवनिर्वाचित विधान परिषद आमदार व कामगारनेते भाई जगताप यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते़ याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे उपस्थित होते.हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘भाई जगताप हे घरेलू कामगारांचे, साखर कारखान्यांच्या कामगारांचे प्रश्न सोडवण्यास आग्रही असतात व हेच नेमके विरोधकांना रुचणारे नव्हते. त्यामुळे विरोधकांचा भाई जगताप यांना पाडण्याचा उद्देश होता़’’ भाई जगताप म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात कामगार संघटनांच्या प्रश्नाकडे थोडे दुर्लक्ष झाले़ विरोधकांनी डाळींचा भाव फक्त फोटो काढून घेण्यासाठी १०० रुपये केला. त्यानंतर मात्र डाळीचा भाव जैसे थे असल्याचे सांगितले.याप्रसंगी विश्वजित कदमांनी पुन्हा एकदा मित्रपक्षावरचा नाराजीचा सूर आळवला व त्याला हर्षवर्धन पाटलांबरोबरच भाई जगतापांनीसुद्धा प्रतिसाद दिला. सहज-सोपी असणारी विधान परिषदेची निवडणूक मित्रपक्षाच्या दुटप्पी वागण्यामुळेच प्रतिष्ठेची झाली होती, असे भाई जगताप यांनी नमूद केले.