शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी पुतळा सन्मानाने बसवा

By admin | Updated: March 30, 2017 02:47 IST

ज्येष्ठ साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी उद्यानात पुन्हा एकदा सन्मानाने बसविला जावा, तसेच लवकरात

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी उद्यानात पुन्हा एकदा सन्मानाने बसविला जावा, तसेच लवकरात लवकर कलाकारांची बैठक बोलावून पुतळ्यासंदर्भातील निर्णय घेण्यात यावा, अशा मागणीचे पत्र अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने महापौर मुक्ता टिळक यांना दिले आहे.संभाजी उद्यानातून गडकरी यांचा पुतळा हटवल्यानंतर कलाकारांमधून या घटनेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पुण्या-मुंबईतील कलाकारांनी एकत्र येऊन गडकरींचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पुतळा तयारही केला. परंतु, कायद्याने महापालिकेव्यतिरिक्त कोणत्याही संस्थेला पुतळा बसवण्याचा अधिकार नाही, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप करून कलाकारांच्या कार्यक्रमास संभाजी उद्यानात मज्जाव केला. त्याचवेळी पुतळा बसवण्यासंदर्भात पुणे महापालिकेत ठराव करण्यात आला.पुणे महापालिका निवडणुकीत विजय मिळवून भारतीय जनता पक्षाने महापालिकेत सत्ता स्थापन केल्याने, पुतळ्यासंदर्भात महापौर मुक्ता टिळक यांना पत्र देऊन त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी कलाकारांनी केली आहे. कलाकारंनी तयार केलेला पुतळा महापालिकेने स्वीकारावा आणि तो संभाजी उद्यानात बसविण्यात यावा, असेही या पत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी)सर्वपक्षीय नगरसेवकांचा होता पाठिंबाअखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्यावर पुणे महानगरपालिकेशी समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात महाजन म्हणाले, की महापालिकेमध्ये निवडणुकांपूर्वी पुतळा बसवण्यासंदर्भातील ठरावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. भाजपानेही पुतळ्यासंदर्भात आश्वासन दिले होते. पुण्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तेव्हा आता लवकरात लवकर यासंदर्भात बैठका घेऊन गडकरी पुतळा बसवण्याच्यासंदर्भात पालिकेने कलाकारांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला पाहिजे.