शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, लसूण, मिरची, शेवगा, गाजराचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याइतकीच स्थिर आहे. मात्र, कांदा, लसूण, हिरवी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याइतकीच स्थिर आहे. मात्र, कांदा, लसूण, हिरवी मिरची, शेवगा, गाजर, घेवडा आणि तोतापुरी कैरीच्या दरात घसरण झाली. तर फ्लॉवरच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. अन्य सर्व फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवार (दि.४) रोजी ८० ते ९० ट्रक शेतीमालाची आवक झाली. यात परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून ३ टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, तामिळनाडू आणि कर्नाटकातून तोतापूरी कैरी ५ ते ६ टेम्पो, हिमाचल प्रदेशातून मटार ३ ट्रक, मध्यप्रदेश आणि गुजरातधून ५ ते ६ ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ४५ ते ५० ट्रक इतकी आवक झाली आहे.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १२०० गोणी,कोबी सुमारे ८ ते १० टेम्पो, प्लॉवर ७ ते ८ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ६ ते ७ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो,पावटा ४ ते ५ टेम्पो, मटार २०० गोणी, भुईमुग शेंग ५० ते ६० गोणी, गावरान कैरी ५ ते ६ टेम्पो, कांदा ५० ते ६० ट्रक इतकी आवक झाली.

--------

भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर

कांदा ०८-१२ १५-२५

बटाटा ०८-१४ १५-३०

टोमॅटो ०८-१२ १५-२५

भेंडी २५-३० ३०-४०

गवार ३५-४० ४०-५०

मिरची ३५-५५ ४५-६०

कोथिंबीर ०७-१० १०-१५

मेथी ०३-०७ १०-१५

मटार ५५-६० ७०-८०

गाजर १०-१४ १५-२०

---

कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, चुका, चवळईचे दर वाढले

मार्केट यार्डात रविवारी कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, चुका आणि चवळईच्या दरात वाढ झाली. तर करडई, पुदीना, अंबाडी, मुळे, राजगिरा आणि पालकचे दर स्थिर होते. तर कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली नाही. रविवारी मार्केट यार्डात कोथिंबिरीच्या दीड लाख जुड्यांची तर मेथीची २५ हजार जुड्यांची आवक झाली. किरकोळ बाजारात कोथिंबीर तब्बल १५ ते २० रुपयांना जुडी तर मेथीची २० ते २५ रुपयांना जुडीची विक्री केली जात होती. कोथिंबीर आणि मेथीच्या दरात घाऊक बाजारात गड्डीमागे पाच रुपये, चुक्याच्या दरात तीन रुपये, शेपू आणि चाकवतच्या दरात जुडीमागे प्रत्येकी दोन रुपये, तर कांदापात आणि चवळईच्या दरात जुडीमागे प्रत्येकी एक रुपयांची वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़