शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरटेकच्या अपघातांना अटकाव

By admin | Updated: April 24, 2017 05:00 IST

देशभरातील रस्ते अपघातापैकी ओव्हरटेक करताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण तब्बल ७० टक्के असून, हे अपघात रोखण्यासाठी

पुणे : देशभरातील रस्ते अपघातापैकी ओव्हरटेक करताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण तब्बल ७० टक्के असून, हे अपघात रोखण्यासाठी पुण्यातील नागरिकाने अ‍ॅक्सिप्रिव्हेंट प्रणाली विकसित केली आहे़ अ‍ॅक्सिप्रिव्हेंट सिस्टिम वाहनावर बसविल्याने रस्त्यावरील अपघातांची संख्या आणि जीवितहानी या शक्यता अगदीच नगण्य होऊ शकतील़अरुण बंडी यांनी ही सुरक्षित ओव्हरटेकिंगसाठी प्रणाली बनविली आहे़ याबाबत बंडी यांनी सांगितले की, कोणत्याही अपघातात शक्यतो दोनच वाहने प्रामुख्याने आढळतात़ ओलांडून पुढे जाणाऱ्या क्रियेमध्ये जास्तीतजास्त ३ वाहने बाधित होऊ शकतात़ सद्यस्थितीत ओव्हरटेकिंगची कोणतीही प्रणाली अस्तित्वात नाही़ तीनही वाहनांना गती सावकाश करणे किंवा थांबविणे या तीनही स्थितीबद्दल, कोण, केव्हा व कोणत्या क्षणी बदल करणार आहे, याची नक्की खात्री किंवा पूर्वकल्पना येणारी कोणतीही प्रणाली सध्याच्या प्रचलित वाहनांत नसल्याने एकमेकांच्या गतिशीलतेतील बदलासंबंधीची सूचना एकमेकांना खात्रीने देता न आल्याने त्यांच्यातील समन्वय चुकतो आणि प्रत्येक क्षणी अपघाताची शक्यता वाढते़ अ‍ॅक्सिप्रिव्हेंट सिस्टिम हा अंदाज चुकण्याच्या स्थितीला पूर्णपणे विराम देऊन तिन्ही वाहनचालकांना व इतर सर्वांनासुद्धा त्यांच्या बदलणाऱ्या हेतूंची आणि त्यायोगे आपल्या गतिशीलतेतील होणाऱ्या बदलाची जाणीव अचूकपणे करून देत आणि अपघाताची शक्यताच नष्ट करते़