शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रस्टचे अध्यक्ष सचिव असल्याचे भासवून पावणेआठ कोटी लाटले, वक्फ मंडळाची केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:12 IST

पुणे : औरंगाबाद येथील वक्फ मंडळाचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र सादर करून ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून शासनाकडून ...

पुणे : औरंगाबाद येथील वक्फ मंडळाचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र सादर करून ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून शासनाकडून नुकसानभरपाईची पावणेआठ कोटींची रक्कम परस्पर लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून बंडगार्डन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रादेशिक वक्फ अधिकारी खुस्त्रो खान सर्फराज खान (वय ४९, रा. कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी इम्तियाज महंमद हुसेन शेख आणि चाँद रमजान मुलाणी (दोघे रा. रामनगर, येरवडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्याकडे ८ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: मुळशी तालुक्यातील माण येथे ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्ट या मुस्लिम ट्रस्टच्या मालकीची सुमारे ८ हेक्टर ५७ जागा आहे. या जमिनीपैकी ५ हेक्टर ५१ आर जमीन शासनाने राजीव गांधी तंत्रज्ञान टप्पा क्रमांक ४ साठी अधिग्रहण केली. त्याचा मोबदला ९ कोटी ६४ लाख ४२ हजार ५०० रुपये मंजूर केला होता. ही रक्कम ट्रस्टला मिळाली नसल्याने ट्रस्टींनी वक्फ बोर्डाला कळविले. त्यानंतर खान यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी केल्यावर हा सर्व प्रकार समोर आला. इम्तियाज शेख यांनी ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्टकडे विश्वस्त नियुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याशिवाय आणखी ३ अर्ज दुसऱ्या विश्वस्तांनी दाखल केले होते. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. तरीही इम्तियाज शेख व चाँद मुलाणी यांनी आपण ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे दाखवून तसेच औरंगाबाद येथील राज्य वक्फ मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे बनावट ना हरकत पत्र उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. सरकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून त्यांच्याकडून ७ कोटी ७६ लाख ९८ हजार २५० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट मिळविला. तो ट्रस्टच्या खात्यावर जमा न करता स्वत:चे बँक खात्यात जमा करून शासनाची व वक्फ मंडळाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.