शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव थेट केंद्राकडे दाखल

By admin | Updated: December 16, 2015 03:30 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची अग्निपरीक्षा देऊन साकार झालेला स्मार्ट सिटी अभियानाचा प्रस्ताव मंगळवारी थेट केंद्राकडे सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी

पुणे : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची अग्निपरीक्षा देऊन साकार झालेला स्मार्ट सिटी अभियानाचा प्रस्ताव मंगळवारी थेट केंद्राकडे सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्वत: दिल्लीला जाऊन हा प्रस्ताव दाखल केला.येत्या २६ जानेवारीला केंद्राच्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतील शहरांची यादी जाहीर होणार आहे. केंद्राच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत देशभरातील ९८ शहरांमध्ये पुणे शहराची निवड झाली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात २० शहरांची निवड केली जाणार असून, त्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या आराखड्याला सोमवारी तब्बल १३ तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर मान्यता देण्यात आली. हा आराखडा केंद्राकडे सादर करण्यासाठी १५ डिसेंबर ही अखेरची मुदत होती. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री काही उपसूचनांसह मंजूर झालेल्या स्मार्ट सिटीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यासाठी आयुक्त कुमार यांनी मंगळवारी स्वत: दिल्लीला जाऊन हा आराखडा सादर केला.या योजनेच्या पुढच्या टप्प्यात ९८ शहरांमधून २० शहरांची निवड केली जाणार आहे. मात्र, ही संख्या ५ ते ६ शहरे इतकीही असू शकते, असेही सांगण्यात येत आहे. नववर्षात प्रजासत्ताक दिनाला निवड होणाऱ्या शहरांची यादी पंतप्रधानाकडून जाहीर केली जाईल. दरम्यान, ही निवड स्पर्धात्मक पद्धतीने होणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने तयार केलेला स्मार्टचा आराखडा केंद्राने घालून दिलेल्या निकषांशी तंतोतंत जुळणारा असल्याने स्मार्टच्या यादीत पुणे शहराचा वरचा क्रमांक असेल.पुण्यापाठोपाठ भुवनेशवर शहराने या योजनेसाठी जोरदार तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या यादीतील पहिल्या क्रमांकासाठी देशभरातील ९८ शहरांमध्ये पुणे आणि भुवनेश्वर या दोन शहरांमध्ये चढाओढ असेल.या पार्श्वभूमीवर, शहरात घडलेल्या घडामोडींमुळे आता पूर्ण शहराचे लक्ष प्रसिद्ध होणाऱ्या यादीकडे लागले आहे.(प्रतिनिधी)