शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी रंगभूमीवर ‘डॅम इट अनू गोरे’चे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 04:04 IST

आदिवासी व्यक्ती म्हणजे अंगाखांद्यावर वस्त्र नसलेली अशी भूकी कंगाल जमात... त्यांच्या जमिनी लाटून त्याच्यावर धरण बांधण्याचे शासनाचे सुरू असलेले प्रयत्न आणि पुनर्वसनाच्या नावाखाली त्यांची झालेली

नम्रता फडणीस पुणे : आदिवासी व्यक्ती म्हणजे अंगाखांद्यावर वस्त्र नसलेली अशी भूकी कंगाल जमात... त्यांच्या जमिनी लाटून त्याच्यावर धरण बांधण्याचे शासनाचे सुरू असलेले प्रयत्न आणि पुनर्वसनाच्या नावाखाली त्यांची झालेली फसवणूक हा प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या ‘व्याकरण’ या पुस्तकाचा ज्वलंत विषय. आठ वर्षांपूर्वी ‘व्याकरण’ हे मूळ नाव बदलून ‘डॅम इट अनू गोरे’ या नावाचे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले होते. या नाटकाला काही प्रमाणात विरोधही झाला. काही प्रयोगानंतर हे नाटक बंद झाले. इतक्या वर्षांपासून हे नाटक मराठी रंगभूमीला पोरके असले तरी हिंदी रंगकर्मींना या विषयाने खुणावले आहे. भातखंडे ललितकला शिक्षा समिती, रायपूरच्या वतीने रंग श्रृंखला नाट्य मंचाकडून ‘व्याकरण’ या नाटकाचे पहिल्यांदाच २८ एप्रिल रोजी हिंदी रंगभूमीवर सादरीकरण होणार आहे.सह्याद्रीच्या खोऱ्यात सह्याद्री जल प्रकल्प उभारण्याचे केंद्र सरकार जाहीर करते. सुरुवातीला हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम भारतीय कंपनी करणार असते. नंतर हे काम कसे अमेरिकन कंपनीला दिले जाते. या धरणासोबत भारतातील सर्व नद्या कालवे काढून एकमेकांना जोडल्या जाणारअसतात. त्यामुळे एखाद्या भागात पाऊस पडला नाही तर या कालव्यातून पाणीग्रस्त भागाला पाणी पोहोचविता येईल, असा त्याचा हेतू आहे. मात्र अनू गोरे ही व्यक्ती त्याला कशा पद्धतीने विरोध करते. अदिवासींच्या पाठीमागे ती कशी ठामपणे उभी राहाते. मग पुढे खटला... अनूला देशद्रोही ठरविण्यामागचं षड्यंत्र असा नाटकाचा विषय आहे.वीस प्रयोगांनंतर नाटक बंद१ मराठी व्यावसायिक रंगभूमीवर अजित भुरे यांनी ‘डॅम इट अनु गोरे’ या नावाने नाटक रंगभूमीवर आणले होते. शीतल क्षीरसागर ही प्रमुख भूमिकेत होती. हे नाटक जेव्हा आले तेव्हा काही जणांनी यानाटकाला विरोध दर्शविला होता. ‘निषेध निषेध’ म्हणून विषय नाकारला होता.२ जवळपास नाटकाचे २० प्रयोग झाले; मात्र, नंतर नाटकालाबुकिंग मिळणे बंद झाल्याने नाटकाचे प्रयोग थांबवावे लागले असल्याची माहिती प्रेमानंद गज्वी यांनी दिली.