शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’ एसपीव्ही आयुक्तांकडून तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 04:00 IST

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीला ज्यावरून सर्वाधिक विरोध झाला त्या वादग्रस्त एसपीव्हीचा (स्पेशल पर्पज व्हेईकल- स्वतंत्र कंपनी) मसुदा तयार झाला असून सोमवारी तो नगरसचिव कार्यालयाकडे

पुणे : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीला ज्यावरून सर्वाधिक विरोध झाला त्या वादग्रस्त एसपीव्हीचा (स्पेशल पर्पज व्हेईकल- स्वतंत्र कंपनी) मसुदा तयार झाला असून सोमवारी तो नगरसचिव कार्यालयाकडे पाठवण्यात येईल. त्यांच्याकडून तो विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करून तिथे मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. याबाबत प्रशासनाकडून गुप्तता बाळगण्यात येत आहे.स्मार्ट सिटी योजनेत पुण्याची देशस्तरावर दुसऱ्या क्रमांकाने निवड होताच केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये एसपीव्हीच्या स्थापनेबाबत त्वरा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आयुक्तांनी या कंपनीचा मसुदा तयार केला आहे. केंद्र सरकारने त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही दिल्या होत्या. त्याप्रमाणे आयुक्तांनी प्राथमिक रचना केली आहे. त्यात कंपनीचा उद्देश, घटना, रचना, कार्यक्षेत्र, अधिकार याबाबतचा समावेश असल्याचे समजते.उपसूचना डावलल्या, आता स्थायी समितीकडे लक्षस्मार्ट सिटीला विरोध करताना बहुसंख्य पदाधिकारी तसेच नगरसेवकांचा या एसपीव्हीवरच सर्वाधिक आक्षेप होता. अशा प्रकारच्या कंपनीमुळे महापालिकेच्या पर्यायाने लोकनियुक्त प्रतिनिधींच्या अधिकारांवर गदा येते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या कंपनीचे अध्यक्ष महापौर असतील, संचालक मंडळात लोकनियुक्त प्रतिनिधीची संख्या जास्त असेल, अशा बऱ्याच उपसूचना त्यांनी प्रस्ताव केंद्राकडे पाठवताना केल्या होत्या. मात्र त्या सर्व उपसूचना डावलल्या गेल्या असल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळेच आता सर्वसाधारण सभेत पदाधिकारी कंपनीच्या मसुद्याला मंजुरी देताना काय करतील, याची उत्सुकता पालिका वर्तुळात तसेच बाहेरही आहे.