शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीची तयारी

By admin | Updated: March 21, 2016 00:57 IST

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणी व संघटन याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे, शिरिष सावंत व अविनाश अभ्यंकर यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणी व संघटन याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे, शिरिष सावंत व अविनाश अभ्यंकर यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. नागरी प्रश्नांवर पक्षाने जास्तीत जास्त आक्रमक भूमिका घ्यावी, अशी सूचना या वेळी नेत्यांनी केली.लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पक्षामध्ये मरगळ आलेली आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या वेळी मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस, अजय शिंदे व विभागीय पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीबरोबरच पाडव्याला होणारा पक्षाचा मेळावा याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या महापालिकेच्या सभागृहात मनसेचे २८ नगरसेवक आहेत. निवडणुकीनंतर मनसे हा सभागृहातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून आला होता. मात्र, गेल्या ४ वर्षांत समीकरण वेगाने बदलत आहेत. देशात आलेल्या मोदी लाटेमुळे केंद्रात व राज्यात सत्तांतर झाले आहे. या सत्तांतराचे तडाखे स्थानिक पातळीवरही बसण्यास सुरुवात झाली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही परप्रांतीयांविरुद्ध पुन्हा एकदा ‘रिक्षा जाळो’ आंदोलनाची घोषणा करून मनसेचा जुना अजेंडा अधिक आक्रमक पद्धतीने राबविण्याचे इरादे जाहीर केले आहेत. रिक्षा जाळो आंदोलनानंतर सर्व स्तरांतून जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी तातडीने काही काळापर्यंत हे आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे. येत्या पाडव्याला ८ एप्रिल रोजी दादर येथील शिवाजी पार्कवर मनसेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मनसेकडून यापुढील काळात पाडवा मेळाव्याद्वारे उत्तर दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेची आगामी निवडणूक ‘४ सदस्यांचा एक प्रभाग’ अशा पद्धतीने घेण्याची चाचपणी राज्य सरकारने सुरू केली आहे. प्रभाग पद्धतीने लढलो तर जास्त फायदा होईल, असे समीकरण मांडून त्या दृष्टीने पावले उचलण्यास भाजपच्या नेत्यांनी सुरुवात केली आहे. सरकारचाच एक भाग असलेल्या शिवसेनेने मात्र या प्रभाग पद्धतीला आपला तीव्र विरोध जाहीर केला आहे. प्रभाग पध्दतीने निवडणुका झाल्यास मनसेला खुप ताकद लावावी लागणार आहे.