शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ कायद्याच्या अधिसूचनेसाठी तयारी

By admin | Updated: January 7, 2016 01:46 IST

प्रस्तावित नवीन विद्यापीठ कायदा हिवाळी अधिवेशनात मंजूर न झाल्यामुळे राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने कायद्याबाबतचा अधिसूचना काढण्याची तयारी

पुणे : प्रस्तावित नवीन विद्यापीठ कायदा हिवाळी अधिवेशनात मंजूर न झाल्यामुळे राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने कायद्याबाबतचा अधिसूचना काढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेला नवीन विद्यापीठ कायदा त्यातील काही वादग्रस्त तरतुदींसह स्वीकारावा लागणार आहेत. परिणामी, उच्च शिक्षण क्षेत्रात कायद्यावरून पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण येणार आहे.राज्याचे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सर्व विद्यापीठांत जाऊन प्रस्तावित कायद्यात कोणत्या बाबींचा समावेश असावा, या संदर्भात शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. मात्र, कोणत्या मसुद्याबाबत चर्चा झाली, हे शेवटपर्यंत कोणालाही समजले नाही. त्याचप्रमाणे नवीन विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यावर तज्ज्ञांकडून कोणत्याही सूचना व हरकती न मागविता थेट विधानसभेत तो सादर करण्यात आला. मात्र, अधिवेशनाचा कालावधी संपल्यामुळे कायद्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. त्यातच विद्यापीठांच्या अधिकार मंडळावरील रिक्त पदांवर कोणत्याही व्यक्तींची नियुक्ती करू नये, असे परिपत्रक शासनातर्फे विद्यापीठांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठांना कामकाज करणे काहीसे अवघड जात आहे. त्याचप्रमाणे शासनाने लवकरात लवकर नवीन विद्यापीठ कायदा लागू करावा, अशी मागणी काही संघटनांनी केली आहे.विद्यापीठ कायद्यावर कोणतीही चर्चा न करता तो लागू करू नये, अशी भूमिका उच्च शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांनी घेतली आहे. मात्र, राज्यातील विविध राजकीय पक्षांमधील दोन प्रमुख नेत्यांशी चर्चा करून विद्यापीठ कायद्याचा अधिसूचना काढली जाणार आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांनी प्रस्तावित विद्यापीठ कायद्यातील काही तरतुदींचे स्वागत केले असले, तरी त्यातील वादग्रस्त तरतुदी काढून मगच कायदा लागू करावा, अशीही मागणी केली आहे. मात्र, उच्च शिक्षण विभागाकडून त्याचा विचार केला जाणार आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.