शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

By admin | Updated: October 30, 2016 02:49 IST

पूर्ववैमनस्यातून भोसरी, गव्हाणेवस्ती येथे विकास लक्ष्मण माळी (वय २०, रा. पांडवनगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी) या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी सायंकाळी ६च्या सुमारास धारदार

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून भोसरी, गव्हाणेवस्ती येथे विकास लक्ष्मण माळी (वय २०, रा. पांडवनगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी) या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी सायंकाळी ६च्या सुमारास धारदार शस्त्रांचे वार केले. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर भोसरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.भोसरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. पूर्ववैमनस्यातून त्याचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना भोसरीत घडलेल्या या खुनाच्या घटनेने शहरात खबबळ उडाली आहे. सर्वत्र दिवाळीच्या सणाची धामधूम सुरू असताना भोसरीत खुनाची घटना घडली. या घटनेने भोसरीतील गव्हाणेवस्ती, तसेच पांडवनगर, चक्रपाणी वसाहत परिसरातील वातावरण बदलून गेले. केवळ भोसरीतीलच नाही, तर या घटनेनंतर शहरातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)भोसरी, गव्हाणेवस्ती परिसरात हातात कुऱ्हाड, कोयता आणि तलवार घेतलेले सहा जणांचे टोळके सायंकाळी सहाच्या सुमारास आले. या टोळक्याने विकास माळी याच्यावर हल्ला केला. कुऱ्हाड, कोयता, तलवारीचे सपासप वार केल्याने जागीच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर जखमी अवस्थेतील विकासला तातडीने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. विकासची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.