शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सेकंडहॅण्ड मोटारीला पसंती

By admin | Updated: November 20, 2014 04:28 IST

घरासमोर एखादी मोटार असावी असे प्रत्येकालाच वाटते. नवी मोटार घेऊन मोठी रक्कम गुंतवून, ३ ते ५ वर्षे बॅँकेचे हप्ते फेडत बसण्यापेक्षा चकचकीत सेकंडहॅण्ड (जुनी) मोटार खरेदी करण्यास पसंती दिली

मिलिंद कांबळे, पिंपरीघरासमोर एखादी मोटार असावी असे प्रत्येकालाच वाटते. नवी मोटार घेऊन मोठी रक्कम गुंतवून, ३ ते ५ वर्षे बॅँकेचे हप्ते फेडत बसण्यापेक्षा चकचकीत सेकंडहॅण्ड (जुनी) मोटार खरेदी करण्यास पसंती दिली जात आहे. झपाट्याने वाढत असलेल्या पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत सेकंडहॅण्ड वाहनांच्या विक्रीचा आलेख उंचावत आहे. घरात एखादी मोटार हवी हे आता सर्वसामान्य कुटुंबांनाही वाटू लागले आहे. मात्र, मोटारीच्या किमती भरमसाट आहेत. मोठी रक्कम अदा करुन आणि बॅँकेचे कर्ज काढून नवी मोटार खरेदी करता येते. मात्र, या रकमेची जमवाजमव करण्यात आर्थिक ओढाताण होते. कर्जाचे हप्ते आणि मोटारीचा दैनंदिन खर्च आणि देखभाल खर्च भागविण्यासाठी कसरत करावी लागते. कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडते. मोठ्या रकमेच्या मोबदल्यात मोटार घेतल्यानंतर ती २ वर्षांनंतर बदलून दुसरी मोटार घेणारा एक वर्ग आहे. सतत नव्या मॉडेल्सचे मोटार वापरणारे नागरिक आहेत. मात्र, १० ते १२ लाखांची मोटार विक्री करताना त्याची किंमत थेट अर्धी होते. अर्ध्या किमतीमध्ये सेकंडहॅण्ड मोटार घेऊन त्याचा वापर करता येतो. २ ते ३ वर्षे वापरुन ती विकता येते. आर्थिक कटीकटीपेक्षा सेकंडहॅण्ड मोटार खरेदीकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. साधारण २ ते ३ लाख रुपयांमध्ये मनपसंत गाडी घेता येते. नवा लूक आणि मॉडेलची वाहने असतात. विविध कंपन्यांचा चॉईस मिळत असल्याने योग्य दर्जाच्या गाडीला पसंती दिली आहे. पूर्वीचा डिझेल वाहनांकडील ओढा कमी झाला असून, पेट्रोल वाहनांना मागणी वाढली आहे. पेट्रोलच्या वाहनाला सीएनजी किट लावून घेता येते. यामुळे वाहन चालविणे अधिक किफायतशीर होते. शहरात सीएनजी पंपांची संख्या पुणे शहराच्या तुलनेत मोठी असल्याने नागरिकांना सीएनजी वाहनांकडे कल वाढत आहे. सेकंडहॅण्ड वाहने खरेदीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात ५० टक्क्यांपर्यत मोटारी सेकंडहॅण्ड असल्याचे सुत्रांनी सांगितले. शहरातील अनेक भागांत सेकंडहॅण्ड वाहनांचे शो- रुम दिसतात. ग्राहकांना उत्तम सेवा दिली जावी आणि विक्रेत्यांमध्ये समन्वय राहावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड मोटार डीलर असोसिएशनची नुकतीच स्थापना झाली आहे. सध्या शहरातील ३५ विक्रेते संघटनेचे सभासद आहेत. शहरात दिवसाला किमान ५ वाहनांची विक्री होते. तेजीच्या काळात हे प्रमाण १० ते १५ वर जाते. भविष्य काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहरात सुमारे १५० एजंट आहेत.