शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिल्लक लस ४५ वर्षांच्या नागरिकांना प्राधान्याने द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाने दुसरा डोस प्राधान्याने द्यावा अशा सूचना केल्या आहेत. त्यासाठी सध्या लस उपलब्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शासनाने दुसरा डोस प्राधान्याने द्यावा अशा सूचना केल्या आहेत. त्यासाठी सध्या लस उपलब्ध आहे. मात्र, अनेक केंद्रांवर दुसऱ्या डोसचे लाभार्थी संपून लस शिल्लक राहत आहे. यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस प्राधान्याने देण्याबाबत परवानगी मिळावी अशी, मागणी आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

कोरोना आणि म्युकरमायकोसिस उपचाराबाबत शासनस्तरावरून मार्गदर्शन व्हावे यासाठी सभापती प्रमोद काकडे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना पत्रव्यवहार केला असून, यात त्यांनी वरील मागणी केली. जिल्ह्यातील अनेक केंद्रांवरील नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. यामुळे त्या केंद्रांवर लस शिल्लक राहत आहे. ४५ वर्षांवरील अनेक नागरिक पहिल्या डोसपासून वंचित असल्याने त्यांना ही लस दिली जावी, याबाबत त्यांनी मागणी केली आहे.

खासगी दवाखान्यात लसीकरण सुरू आहे. मात्र, ही दवाखाने लसीसाठी वेगवेगळ्या शुल्काची आकारणी करत आहेत. एका दवाखान्यात एक तर दुसऱ्या दवाखान्यात एक यामुळे याबाबत शासनस्तरावरून एकच दरनिश्चित केला जावा. म्युकरमायकोसिसचे अ‍ॅम्पोटेरेसिन बी विक्रीवर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे. ते केवळ जिल्हा नियंत्रण कक्षाकडून मिळते. यामुळे इतर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. याबाबत शासन स्तरावर मार्गदर्शन करण्याच्याही सूचना काकडे यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

चौकट

महात्मा फुले जनधन योजनेत रुग्णालयांची संख्या वाढवा

म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचाराकरिता महात्मा फुले जनआरोग्य योजना ही मोजक्याच रुग्णालयात आहे. त्यामुळे अनेकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. परिणामी या योजनेअंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

चौकट

परदेशात विद्यार्थी शिक्षणासाठी जात असतात. काही विद्यार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे. कोविशिल्ड लस घेतलेल्यांना दुसरा डोस हा ८४ दिवसांनी मिळणार आहे. मात्र, परदेशात जाण्यासाठी लसीकरण पूर्ण झाल्याचा दाखला असणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांत संभ्रमावस्था असल्याने याबाबतही स्पष्टता आणण्याची मागणी काकडे यांनी केली.