शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑफलाइनपेक्षा ऑनलाईन परीक्षेला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:12 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यापीठांना सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावे लागत आहेत. मात्र, ऑफलाईन परीक्षेपेक्षा विद्यार्थी ऑनलाईन ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यापीठांना सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावे लागत आहेत. मात्र, ऑफलाईन परीक्षेपेक्षा विद्यार्थी ऑनलाईन परीक्षांना अधिक उपस्थिती लावत असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. परीक्षा ऑनलाईन होत असल्या, तरी विद्यापीठाने सुमारे ४०० विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना पकडले आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा १० एप्रिल रोजी सुरू करण्यात आल्या. या परीक्षा सुरू होऊन बरोबर एक महिना पूर्ण होत आहे. विद्यापीठाच्या सुमारे ९० टक्के परीक्षा संपल्या असून, आता केवळ कला व वाणिज्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षांच्या निकालाची प्रक्रिया सुरू केली आहे.

विद्यापीठातर्फे सुमारे साडेपाच लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, विज्ञान, औषधनिर्माण शास्त्र, विधी आदी अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर पदवीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आहेत. तसेच परीक्षेदरम्यान काही तांत्रिक कारणांमुळे अडचण आलेल्या सुमारे चौदाशे विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १६ मेनंतर घेण्याचे प्रस्तावित आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे म्हणाले की, विद्यापीठातर्फे ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना दरवर्षी सुमारे ८० ते ८५ टक्केच विद्यार्थी उपस्थित असतात. मात्र, विद्यापीठाकडून ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात असल्यामुळे उपस्थितीचे प्रमाण सरासरी ९५ टक्‍क्‍यांपर्यंत गेले आहे. त्यामुळे ऑफलाइनपेक्षा ऑनलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन परीक्षा घेत असताना प्रॉक्टरिंग केले जात आहे. सुमारे चारशे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देताना गैरप्रकार करत असल्याचे आढळून आले आहे.

--

विद्यापीठाने सुरू केलेल्या ऑनलाइन परीक्षांना १० मे रोजी बरोबर एक महिना पूर्ण होत आहे. विद्यापीठाच्या सुमारे ९० टक्के परीक्षा संपल्या असून केवळ कला व वाणिज्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा आता उरल्या आहेत. विद्यापीठाने सर्व विषयांचे निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

- महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ