शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

दर्जेदार घरकुलांना देणार प्राधान्य

By admin | Updated: April 26, 2017 02:59 IST

झोपडपट्टीमुक्त बारामती अभियान राबविण्याच्या घोषणा अनेकदा करण्यात आल्या. यापूर्वी सुहासनगर आणि उघडा मारुती मंदिर

बारामती : झोपडपट्टीमुक्त बारामती अभियान राबविण्याच्या घोषणा अनेकदा करण्यात आल्या. यापूर्वी सुहासनगर आणि उघडा मारुती मंदिर येथे २७८ घरांची योजना राबविण्यात आली. त्यानंतर आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेत बारामती नगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे. बारामती ‘झोपडपट्टीमुक्त’ करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. नगरपालिकेने या योजनेत गुणवत्ताधारक सल्लागार अभियंता निश्चित करण्याचा ठराव केला आहे. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सांगितले, की बारामती शहराची हद्दवाढ झाली. त्यामुळे झोपडपट्टीचा विकास नियोजनबद्ध करणे शक्य आहे. त्यामुळे पक्षनेत्यांना अभिप्रेत आराखडा करण्याचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत बारामतीचा समावेश झाला, ही बाब कौतुकास्पद आहे, त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना काळजी घेतली जाईल. या योजनेत चार घटकांचा समावेश केला. त्यामधील आर्थिक दुर्बल, अल्पउत्पन्न गटातील लाभार्थ्यांना कर्ज संलग्न व्याज, अनुदान मिळण्यासाठी बॅँका, गृहनिर्माण वित्तीय संस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर मध्यमवर्गीय व इतर घटकांच्या घरकुल योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधिक प्राधिकरण आणि स्थानिक स्वराज संस्थांना अधिकार देण्यात आहे. त्याचबरोबर दुर्बल, अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांच्या घरकुलांबाबत निर्णय घेत असताना शासकीय यंत्रणा आणि खासगी संस्थाशी भागीदारी करून योजना कार्यान्वीत करणेदेखील शक्य आहे. त्यामध्ये ३५ टक्के घरे दुर्बल घटकांसाठी असणे बंधनकारक आहे. राहत्या घराची वाढ करणे, मालकी हक्काच्या जागेत पक्के घर बांधणे आदींचा समावेश त्यामध्ये आहे. म्हाडा या नोडल एजन्सीच्या वतीने राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने करायची आहे. बारामतीचे क्षेत्रफळ पूर्वीपेक्षा अनेकपट वाढले आहे. त्यामुळे उपलब्ध जागेचा योग्य विनियोग करणे शक्य आहे.(प्रतिनिधी)