शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलांच्या बांधणीला प्राधान्य

By admin | Updated: March 17, 2017 02:31 IST

शहराचा वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा

पुणे : शहराचा वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे नवनिर्वाचित सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी गुरुवारी सांगितले. त्याचबरोबर पिंपरी-सांडस येथील कचरा प्रकल्पाची जागा हस्तांतरण, जायका प्रकल्पाची अंमलबजावणी आदी प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही भिमाले यांनी दिली.महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी भाजपाचे गटनेते श्रीनाथ भिमाले यांची सभागृह नेतेपदी निवड केल्याचे पत्र त्यांना दिले. या वेळी शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक मुरली मोहोळ उपस्थित होते. त्यानंतर भिमाले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.भिमाले यांनी सांगितले, ‘‘शहरात वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे, त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सुरू असलेल्या उड्डाणपुलांचे काम लवकर मार्गी लावले जाईल. त्याचबरोबर रहदारीच्या ठिकाणी आणखी उड्डाणपुलांची उभारणी केली जाणार आहे. उड्डाणपुलांसाठी राज्य शासनाकडून निधी मिळविला जाणार आहे.’’पिंपरी-सांडस येथील जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव गेल्या ४ महिन्यांपासून राज्य शासनाकडे प्रलंबित आहे, त्याला कधी मंजुरी मिळणार, याची भिमाले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, ‘‘पिंपरी-सांडसच्या जागेबाबत मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे, लवकरच त्याला शासनाची मंजुरी मिळेल.’’जायका प्रकल्पासाठी पर्यावरण सचिवांची सही झालेली नाही, त्यामुळे तो पुढे सरकू शकला नसल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी या वेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)