शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्डांचे बेसुमार वाटप

By admin | Updated: May 12, 2014 02:25 IST

अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या ९ परिमंडळ कार्यालयांमध्ये आंबिल ओढा येथील ह कार्यालयाने गेल्या ७ महिन्यांमध्ये तब्बल १६ हजार ३०० रेशनकार्डांचे बेसुमार वाटप करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

पुणे : अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या ९ परिमंडळ कार्यालयांमध्ये आंबिल ओढा येथील ह कार्यालयाने गेल्या ७ महिन्यांमध्ये तब्बल १६ हजार ३०० रेशनकार्डांचे बेसुमार वाटप करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आंबिल ओढा कार्यालयाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात रेशनकार्ड का घेतले जात आहेत, त्यांच्याकडून व्यवस्थित वाटप झाले आहे का, याची चौकशी करण्याची गरज अद्याप अन्नधान्य वितरण कार्यालयास वाटलेली नाही. परिमंडळ ह कार्यालयातून कोरे रेशनकार्ड गहाळ होणे, कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता केली नसतानाही कागदपत्रांचे वाटप करणे, सहायक परिमंडळ अधिकार्‍यांना रेशनकार्डवर सही करण्याचे अधिकार नसताना बेकायदेशीरपणे सह्या करून रेशनकार्डांचे वाटप करणे, असे असंख्य गैरप्रकार उजेडात आले. या पार्श्वभूमीवर लोकहित फाउंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून सप्टेंबर २०१३ ते मार्च २०१४ या ७ महिन्यांच्या काळात शहरातील ८ परिमंडळ कार्यालयांना किती रेशनकार्डांचे वाटप केले याची माहिती घेतली. परिमंडळ ह कार्यालयाने सरासरी दिवसाला १०० रेशनकार्डांचे वाटप करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला असल्याचे आढळून आले आहे. या कार्यालयाकडून पिवळे, केशरी व शुभ्र अशा १६ हजार ३०० रेशनकार्डांचे वितरण करण्यात आले आहे. त्यानंतर इ परिमंडळाने ६ हजार ५५०, फ परिमंडळाने ५३९३, क परिमंडळाने ४ हजार ७५९, अ परिमंडळाने ४ हजार ५५० रेशनकार्डांचे वितरण केले आहे. ग परिमंडळ कार्यालयाने सर्वात कमी ६५० रेशनकार्डांचे वितरण केले आहे. परिमंडळ कार्यालयाकडून आलेल्या मागणीनुसार अन्नधान्य कार्यालयाकडून त्यांना रेशनकार्ड दिले जाते. मात्र कोणत्या कार्यालयास किती रेशनकार्ड दिले, त्याचा त्यांनी व्यवस्थित लेखाजोखा ठेवला आहे का, याची मात्र कोणतीही तपासणी केली जात नसल्याचे आढळून आले आहे. (प्रतिनिधी)