शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
3
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
4
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
5
एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
6
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
7
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
8
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
9
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
10
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
11
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
12
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
13
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
14
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
15
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
16
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
17
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
18
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
19
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
20
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

अनुपम खेर, शायरा बानो यांना प्रमोद महाजन पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 3:12 PM

‘स्व. प्रमोद महाजन स्मृति पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि ‘तीन तलाक’ साठी यशस्वी लढा देणार्‍या शायरा बानो यांना जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देचित्रपट आणि कला क्षेत्रासाठी अनुपम खेर यांचे बहुमूल्य योगदान ‘तीन तलाक’ ही घटस्फोटाची पध्दत घटनाबाह्य ठरवावी यासाठी शायरा बानो यांचा यशस्वी लढा

पुणे- ‘ मुक्तछंद’ या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ‘स्व. प्रमोद महाजन स्मृति पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि ‘तीन तलाक’ साठी यशस्वी लढा देणार्‍या शायरा बानो यांना देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते येत्या रविवारी दि. २९ आॅक्टोबर रोजी  दुपारी ४.३०  वाजता कोथरुडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. खासदार अनिल शिरोळे, खासदार पूनम महाजन, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

अनुपम खेर यांची नुकतीच फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. खेर यांनी ३५ वर्षांहून अधिक काळ चित्रपट आणि कला क्षेत्रासाठी बहुमूल्य योगदान दिले आहे. त्याचा बहुमान करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.‘तीन तलाक’ प्रथेविरोधात उत्तराखंडमधील शायरा बानो यांनी मूळ याचिका दाखल केली होती. ‘तीन तलाक’ ही घटस्फोटाची पध्दत मुस्लिम महिलांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारी आहे. आकस्मिक, एकाकी व बदलता न येणारी ही पध्दत घटनाबाह्य ठरवावी यासाठी शायरा बानो यांनी यशस्वी लढा दिला. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम, सीताराम बुवा चॅरिटेबल ट्रस्टचे विकास वालवलकर, शहीद जवान चंद्रकांत गलांडे यांच्या वीरपत्नी  निशा गलांडे आदी मान्यवरांना यापूर्वी प्रमोद महाजन स्मृति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे.

टॅग्स :Anupam Kherअनुपम खेर