शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रेमाला’ आला बहर...

By admin | Updated: February 15, 2016 01:37 IST

शुभेच्छांची देवाणघेवाण... गिफ्ट्स... चॉकलेट्स... गुलाबांचा बुके... अशा प्रेमाची अभिव्यक्ती करणाऱ्या माध्यमातून तरूणाईने ‘व्हॅलेंटाइन डे’ रविवारी मोठ्या उत्साहात साजरा केला.

शुभेच्छापत्र... गिफ्ट्स... चॉकलेट्सच्या माध्यमातून ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरापिंपरी : शुभेच्छांची देवाणघेवाण... गिफ्ट्स... चॉकलेट्स... गुलाबांचा बुके... अशा प्रेमाची अभिव्यक्ती करणाऱ्या माध्यमातून तरूणाईने ‘व्हॅलेंटाइन डे’ रविवारी मोठ्या उत्साहात साजरा केला. सुटीच्या दिवसाचे औचित्य साधून लोणावळा, खंडाळा परिसरासह विविध हॉटेल, मॉल, कॉफी शॉप, चित्रपटगृहे, झेड ब्रिज आदी ठिकाणं तरूण-तरूणींच्या गर्दीने फुलून गेले होते... ‘लाजून हासणे अन् हासून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे...’ या गीताप्रमाणे ‘त्या’च्या प्रेमाला मिळालेला ‘ती’चा लडिवाळ होकार यातून त्या दोघांचा दिवस सार्थकी ठरला. ‘प्रेम’ ही खूप सुंदर भावना आहे, तिचे प्रकटीकरण करावे का नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या निमित्ताने पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण केले जात आहे, अशा आरोळ्या ठोकणाऱ्या मंडळींकडून याला कितीही विरोध होत असला, तरी तरुणाई दर वर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’ हक्काचा दिवस असल्यासारखे साजरा करते. यंदाही हा दिवस साजरा करण्याच्या तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. शहरातील विविध मॉल, हॉटेलमध्येही तरूणाईला आकर्षित करण्यासाठी सजावट करण्यात आली होती. काहींनी स्पेशल आॅफर ठेवल्याचे दिसून आले. दुपारनंतर जंगलीमहाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, कँप या भागातील रस्त्यांवर गर्दी जाणवायला सुरूवात झाली. गुलाब, चॉकलेट्स देण्याकडे तरूणाईचा कल अधिक होता. शॉपिंग करण्यासाठीही कपड्याच्या दुकानामध्ये तरुणाईची झुंबड उडाली होती. तरूणाईसाठी टाइमपास असलेले एकमेव ठिकाण म्हणजे ‘कॉफी शॉप.’ त्यामुळेच सीसीडी, बरिस्ता अशा ठिकाणी तरुणाईने हा दिवस साजरा करणे पसंत केले. व्हॉट्स अप आणि फेसबुकच्या जमान्यात शुभेच्छापत्र देण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी ते भावनांचे काव्यरूपी संदेशवहन करणारे माध्यम ठरत असल्याने भेटवस्तूबरोबरच शुभेच्छापत्र देण्यालाही प्राधान्य देण्यात आले. सोशल नेटवर्किंग साइट्सवर ‘व्हॅलेंटाइन’च्या शुभेच्छांचा वर्षावकोण म्हणतं व्हॅलेंटाइन फक्त जोडप्यांनीच साजरा करायचा असतो? मित्र-मैत्रिणीदेखील ‘व्हॅलेंटाइन’चे मेसेज एकमेकांना पाठवू शकतात... त्यामुळे व्हॉट्स अप आणि फेसबुकवर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. प्रेमी युगलांनीही याच माध्यमांचा आधार घेत गुलाब, चॉकलेट्स, प्रेम व्यक्त करणारे संदेश याद्वारे आपले प्रेम आवडत्या व्यक्तीकडे व्यक्त केले.