जेजुरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी शालेय विद्याथ्र्याशी दृक्श्रव्य माध्यमाद्वारे संपर्क साधणार होते. विद्याथ्र्याना मार्गदर्शन करणार होते. यासाठी पुरंदर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून तालुक्यातील सर्व शाळांतील विद्याथ्र्याना ही संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे पुरंदर तालुक्यात सर्वत्र पंतप्रधानांच्या भाषणाचे कौतुक होत आहे.
सासवड : 5 सप्टेबर शिक्षक दिनाचे ओचीत्य साधून पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार वाहिन्यांवरून केलेल्या भाषणाला, बहुसंख्य शाळांनी चांगला प्रतिसाद दिला. अनेक शाळा मधून दूरचित्नवाणी संच आणून तर ग्रामीण भागातील काहीवाडय़ा वस्त्यांवर एफ एम वाहिनीद्वारे विद्याथ्र्याना ऐकविण्यात आले. सासवड येथील पुरंदर हायस्कूल चे जेष्ठ प्राध्यापक केशव काकडे यांनी पंतप्रधानांचे भाषणातून शिक्षक व विद्यार्थी यांचे प्रबोधन झाल्याचे सांगितले . विद्यार्थी हे शिक्षकांचे अनुकरण करतात त्यामुळे शिक्षकांचे वर्तन चांगले पाहिजे हा मुद्दा महत्वाचा असल्याचे काकडे म्हणाले . गुरोळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास जगताप यांनी पंतप्रधानांचे भाषण विविध क्षेत्नांना स्पर्श करणारे होते असे सांगितले. पिसर्वे येथील डॉ कोलते विद्यालयातील शिक्षक प्रल्हाद पवार यांनी मोदी यांच्या भाषणातून विद्याथ्र्यांना समानतेची वागणूक, पर्यावरण संतुलन अशा स्वरूपातील संदेश मिळाल्याचे सांगितले.(वार्ताहर)
टीव्ही नसल्याने संधी हुकली
भाषण दुपारी असल्याने जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा दुपारी भरवण्यात आल्या होत्या. बहुतेक शाळांतून टीव्हीची सुविधा नसल्याने इछा असूनही शिक्षकांना विद्याथ्र्याना ही संधी देता आली नाही. अनेक ठिकाणी शिक्षकांनी विद्याथ्र्याच्या एखाद्या पालकाच्या घरी सोय केली होती, तर काही शाळांनी विद्याथ्र्याना भाषण घरी ऐकण्यास सांगितले होते. काही शाळांनी नवीन टीव्ही खरेदी करून ही संधी आपल्या विद्याथ्र्याना मिळवून दिली.
अन् भाषण गेले डोक्यावरून
थेट पंतप्रधानांचे आपल्याला उद्देशून भाषण आणि संपर्क पाहून विद्याथ्र्यात प्रचंड उत्सुकता होती. मात्र, मोदींचे भाषण मुलांच्या डोक्यावरून गेले, तर माध्यमिक विद्यालयातील विद्याथ्र्यानी पंतप्रधानांचे भाषण मन लावून ऐकले; मात्र मोदींनी विद्याथ्र्याशी थेट संपर्क साधला होता. विद्याथ्र्यानी त्यांना हिंदी इंग्रजीतून प्रश्न विचारले, विद्याथ्र्याना ते समजलेच नाहीत. मात्र, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्याथ्र्याच्या चेह:यावर समाधानाचे भाव दिसत होते.