शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

प्रदीप कोडीतकर ‘उरुळी कांचन केसरी’

By admin | Updated: March 21, 2017 05:03 IST

येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रा उत्साहात साजरी होताना झालेल्या कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात कोल्हापूर येथील मोतीबाग

उरुळी कांचन : येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रा उत्साहात साजरी होताना झालेल्या कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात कोल्हापूर येथील मोतीबाग तालमीचा पैलवान प्रदीप कोडीतकर याने ‘उरुळी कांचन केसरी २०१७’साठी असलेली चांदीची गदा व रोख ५१ हजारांचे इनाम जिंकले.यात्रेमधील महत्त्वाचे आकर्षण असलेल्या कुस्ती आखाड्यासाठी विविध ठिकाणांहून सुमारे ९० मल्ल सहभागी झाले होते, तर पंच म्हणून माजी उपसरपंच दत्तात्रय बाजीराव कांचन, युवराज कांचन, प्रकाश कांचन यांनी चोख कामगिरी बजावली. मानाची कुस्ती दिल्ली येथील पैलवान मनोज कुमार व जावजीबुवाचीवाडी (ता. दौंड) येथील व कोल्हापूर येथील मोतीबाग तालमीचा पैलवान प्रदीप कोडीतकर यांच्यात झाली. या कुस्तीत कोडीतकर याने मनोजकुमारवर बाजी मारत उरुळी कांचन केसरी २०१७ चा किताब पटकावला. कोडीतकर याला काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने ५१ हजार रुपये रोख व कै. धनंजय गुलाबराव कांचन यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली. काळभैरवनाथ यात्रेची सांगता ‘ती फुलराणी’ या नाटकाने व मनमोहक अशा दारूकामाच्या आतषबाजीने झाली. या वेळी भैरवनाथ सेवा समितीचे पदाधिकारी तसेच उत्सव समिती कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.