शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी बचत गटाच्या महिला करणार प्रबोधन

By admin | Updated: March 15, 2016 03:59 IST

आता गावागावांत जाऊन महिला बचत गटाच्या सदस्य दारूबंदीसाठी प्रबोधन करणार आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणने व्यसनमुक्तीची नावीन्यपूर्ण योजना हाती घेतली असून, तिला जिल्हा

पुणे : आता गावागावांत जाऊन महिला बचत गटाच्या सदस्य दारूबंदीसाठी प्रबोधन करणार आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणने व्यसनमुक्तीची नावीन्यपूर्ण योजना हाती घेतली असून, तिला जिल्हा नियोजनेने मान्यता दिली असल्याचे प्रकल्पप्रमुख दिनेश ढोके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. गावात महिलांनी एकत्र येऊन दारूबंदी केली, तरी तिला यश येत नाही. याचे कारण मानसिकता. ही मानसिकता बदलण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागात गरीब कुटुंबांना दारिद्र्याच्या बाहेर येण्यासाठी मोठा अडसर ठरतो तो व्यवसनाधीनता. प्रबोधन, समुपदेशन या मार्गाने अनेकांनी व्यसने सोडल्याची उदाहरणे आहेत. व्यवसानांचे गांभीर्य व दुष्परिणाम, याची माहिती पटवून दिली तर व्यसन सुटू शकते. त्यामुळे महिला बचत गटाच्या व जिल्हा नियोजनच्या माध्यमातून ही योजना राबविण्याचे ठरविण्यात आले. तसा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे दिल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी तिचे स्वागत करून तिला मंजुरी दिली आहे. यासाठी आता स्वयंसेवक प्रशिक्षण कायक्रम घेतला असून, १३० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)या १३० स्वयंसेवकांना तज्ज्ञांमर्फत मार्गर्शन करून ग्रामस्थांची मानसिकता कशी बदलायची, हे शिकविणार आहेत. १७ ते २८ मार्चदरम्यान हे प्रशिक्षण होणार असून, हे प्रशिक्षीत गावागावांत महिला बचत गटांना बरोबर घेऊन दारूबंदी करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.