शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागरचना, आरक्षणाची उत्सुकता शिगेला

By admin | Updated: October 7, 2016 03:06 IST

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या बहुचर्चित ४ सदस्यीय प्रभागरचनेवरचा पडदा उद्या (शुक्रवारी) उठणार असून, गणेश कला क्रीड मंदिर सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता प्र

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या बहुचर्चित ४ सदस्यीय प्रभागरचनेवरचा पडदा उद्या (शुक्रवारी) उठणार असून, गणेश कला क्रीड मंदिर सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता प्रभागांच्या आरक्षणांची सोडत काढली जाणार आहे. नवा प्रभाग कसा असणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.प्रभाग नेमका कसा असेल याचे वेगवेगळे अंदाज इच्छुक उमेदवारांकडून लढविले गेले. ती प्रभागरचनाच महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून आज जाहीर केली जाणार आहे. चार सदस्यांच्या प्रभागातील जागांचे नामकरण १ अ, १ ब, १ क व १ ड असे करण्यात आले आहे. या प्रभाग रचनेसाठी २०११ची जनगणना लोकसंख्या प्रमाणित धरण्यात आली आहे. प्रत्येकी ४ सदस्यांचे ३९ प्रभाग व प्रत्येकी ३ सदस्यांचे २ प्रभाग अशा एकूण ४१ प्रभागांचे नकाशे या वेळी जाहीर करण्यात येणार आहेत.प्रभागातील एकूण चार सदस्यांपैकी २ सदस्य महिला असतील. तीन सदस्यांच्या प्रभागात असे करता येणार नसल्यामुळे तिथे त्यातील एका प्रभागात दोन महिला सदस्य असतील व दुसऱ्यात एकच महिला सदस्य असेल. याप्रमाणे त्या सहा सदस्यांपैकी ३ महिला व ३ पुरुष सदस्य असणार आहेत.आरक्षण निश्चित करताना प्रत्येक प्रभागात उपलब्ध असलेली पहिली जागा ही त्या त्या प्रवर्गाकरिता आरक्षित होईल. प्रभाग क्रमांक १ ते ४१ छापील चिठ्ठ्या काढण्यात येणार आहेत. या चिठ्ठ्या एका पारदर्शक ड्रममध्ये टाकून शालेय विद्यार्थ्याच्या हातून ड्रम फिरवून त्यातून चिठ्ठी काढली जाईल. आरक्षण निश्चित करताना प्रत्येक प्रभागात उपलब्ध असलेली पहिली जागा ही त्या-त्या प्रवर्गाकरिता आरक्षित होईल. उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक ५ व १७ हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जातींसाठी राखीव होत असल्यास त्यातील जागा क्रमांक ५ अ व १७ अ अनुसूचित जातींकरिता राखीव होतील. याच पद्धतीने सर्व राखीव गटांची सोडत काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)अशा असणार आरक्षित जागामहापालिकेच्या एकूण १६२ जागांपैकी अनुसूचित जातींसाठी (एससी) एकूण २२ जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यातील ११ जागा त्या गटाच्या महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) २ जागा राखीव असून, त्यातील १ जागा महिलांसाठी राखीव असेल. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) एकूण ४४ जागा असून, त्यातील २२ महिलांसाठी असतील व उर्वरित ९४ जागा सर्वसाधारण असतील. त्यातील ४७ महिलांसाठी राखीव असतील. हरकती १० ते २५ आॅक्टोबरपर्यंत नोंदविता येणार1निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार प्रभागरचनेचा आराखडा तयार झाला नसल्यास त्याबाबत १० ते २५ आॅक्टोबर पर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत.2त्या हरकती महापालिकेची मुख्य इमारत, सावरकर भवन येथील निवडणूक कार्यालय व सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नोंदविता येणार आहेत. हरकतींवर ४ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेतली जाणार आहे.