शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

एसपीव्हीमुळे पालिकेचे अधिकार कमी होणार नाहीत

By admin | Updated: December 13, 2015 02:56 IST

स्मार्ट सिटी आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या स्पेशल पर्पज व्हेईकलमुळे (एसपीव्ही) महानगरपालिकेचे कोणतेही अधिकार कमी होणार नाहीत. स्मार्ट सिटी

पुणे : स्मार्ट सिटी आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या स्पेशल पर्पज व्हेईकलमुळे (एसपीव्ही) महानगरपालिकेचे कोणतेही अधिकार कमी होणार नाहीत. स्मार्ट सिटी प्रकल्पची अंमलबजावणी करण्यामध्ये महापालिका महत्त्वाचे अंग असणार आहे, तसेच एसपीव्हीमध्ये महापालिकेच्या लोकप्रतिनिधींना पुरेसे प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्याचबरोबर औंध-बाणेरव्यतिरिक्त इतर भागांमध्येही स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकासकामे केली जाणार असल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले आहे. कुणाल कुमार यांनी शुक्रवारी स्मार्ट सिटी आराखड्याबाबत असलेले प्रश्न वृत्तपत्रांच्या संपादकांकडून मागविले होते, त्याला त्यांनी शनिवारी लेखी उत्तरे दिली आहेत. त्यांना २३ प्रश्न विचारण्यात आले होते. त्याची उत्तरे देऊन स्मार्ट सिटी आराखड्याबाबतचे आक्षेप खोडून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत कोणतीही करवाढ केली जाणार नाही, अतिरिक्त करवाढ करण्याचे अधिकार महापालिकेच्या मुख्य सभेला असणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.याबाबत त्यांनी म्हटले आहे की, ‘स्मार्ट सिटी अंतर्गत पॅन सिटी उपाययोजना म्हणून औंध- बाणेरव्यतिरिक्त इतर भागांमध्येही विकासकामे केली जाणार आहेत. त्यामध्ये संपूर्ण शहरामध्ये स्मार्ट वाहतूक प्रणाली राबविली जाणार आहे. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाणार आहे. बसना जीपीएस प्रणाली बसविणे, स्मार्ट रहदारी व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत ३१९ सिग्नल, पादचारी मार्ग, आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीचा वापर करणे, सीसीटीव्ही, सौरऊर्जा पॅन इत्यादी उभारणी केली जाणार आहे. औंध बाणेरनंतर शहरातील इतर भागांमध्ये त्यानुसार विकासाच्या योजना राबविल्या जाणार आहेत.’’स्मार्ट सिटी आराखडा शेवटच्या क्षणी नगरसेवकांना देण्यात आला त्यामुळे त्यांना याचा अभ्यास करता आला नाही, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले की, ‘स्मार्ट सिटीचे डॉकेट २ डिसेंबरला स्थायी समितीपुढे सादर केले होते. स्थायी समितीमध्ये त्याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्या अनुषंगाने बदल करून त्याला अंतिम रूप देण्याचे काम ८ डिसेंबरपर्यंत पूर्ण केले. आराखडा मुख्यसभेपुढे ठेवणारी पुणे ही एकमेव महापालिका आहे.