शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

संगीतात दु:ख दूर करण्याचे सामर्थ्य

By admin | Updated: January 14, 2017 02:38 IST

संगीत हे जीवनात चैतन्य निर्माण करते. मन दु:खी झाले, की मी लता, आशा आणि किशोरकुमार यांची गाणी ऐकतो. दु:ख विसरतो,

पिंपरी : संगीत हे जीवनात चैतन्य निर्माण करते. मन दु:खी झाले, की मी लता, आशा आणि किशोरकुमार यांची गाणी ऐकतो. दु:ख विसरतो, पुन्हा ताजातवाना होतो. संगीतात दु:ख दूर करण्याचे सामर्थ्य आहे, अशा भावना प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांनी चिंचवड येथे व्यक्त केल्या. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल यांच्या वतीने आयोजित चिंचवड येथील विस्तारित चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन देव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आयुक्त दिनेश वाघमारे होते. व्यासपीठावर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, मुख्य संयोजक प्रवीण तुपे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, अभियंता सतीश इंगळे आदी उपस्थित होते. सीमा देव म्हणाल्या, ‘‘पुरस्कार हे कलाकारासाठी टॉनिकसारखे असतात. कलावंतांच्या जीवनात ते महत्त्वाचे असतात. त्या ऊर्जेवरच कलाकार मोठा होतो. त्यामुळे कलाकारांना पुरस्कार मिळायला हवेत.’’जब्बार पटेल म्हणाले, ‘‘अत्यंत सुनियोजितपणे विकसित झालेले हे शहर आहे. येथील रस्ते सुंदर आहेत. चित्रपट निर्मितीसाठी हा परिसर उत्तम आहे. आज उत्तम अभिनेता आणि खलनायकाची भूमिका उत्तमपणे पेलणारे कलावंत उपस्थित आहेत. चित्रपटसृष्टीतील रमेश-सीमा ही तरूण अशी जोडी आहे.’’दिनेश वाघमारे म्हणाले, ‘‘सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी हा महोत्सव चांगला आहे. उत्तम चित्रपटांचे चित्रीकरण होण्यासाठी या परिसरात चांगल्या पायाभूत सुविधा निर्र्माण करणे आणि संस्था निर्माण करण्यासंदर्भात प्रयत्न व्हायला हवेत. चित्रपटनिर्मिती झाल्यास येथे रोजगार निर्मितीही होणार आहे. कलागुणांची जोपासना करण्यासंदर्भात प्रयत्न व्हायला हवेत.’’प्रतिमा दातार यांनी सूत्रसंचालन केले. सतीश इंगळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)