शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भंगाराचा माल बनवतोय कोट्यधीश!

By admin | Updated: February 15, 2016 02:41 IST

कारखान्यात गुणवत्तेचे सारे निकष पार करून पक्का व चांगला माल तयार होतो... गुणवत्ता अधिकारी चांगल्या मालावर ‘रिजेक्ट’ (डिफॉल्ट) चा शिक्का मारला जातो..

सुनील भांडवलकर,  कोरेगाव भीमाकारखान्यात गुणवत्तेचे सारे निकष पार करून पक्का व चांगला माल तयार होतो... गुणवत्ता अधिकारी चांगल्या मालावर ‘रिजेक्ट’ (डिफॉल्ट) चा शिक्का मारला जातो..तो माल क्षणात स्क्रॅप होतो...स्क्रॅपच्या टोळ्या शिताफीने तो कारखान्याच्या बाहेर काढतात... बाजारभावापेक्षा कमी किमतीत तो स्क्रॅप माल विकला जातो. या साऱ्यातील कमाई असते अक्षरश: कोट्यवधी रुपयांची...! त्यामुळेच आता भंगारातून कोट्यधीश बनण्याचा नवा मार्ग चोरट्यांना गवसू लागला आहे. पुणे-नगर महामार्गावरील औद्योगिक वसाहतीमध्ये राजरोसपणे हा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कारखानदार व लोकप्रतिनिधींचे लागेबंधे असल्याने या क्षेत्रात प्रचंड आर्थिक उलाढाल होते. स्क्रॅपच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनैतिक व भरमसाठ पैशामुळे या क्षेत्राकडे स्क्रॅपमाफिया व स्थानिक तरुण मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. त्यातून औद्योगिक वसाहतीत विनापरवाना हत्यारबंद टोळ्या निर्माण झाल्या आहेत. पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा, सणसवाडी , शिक्रापूर, रांजणगाव, कोरेगाव, ढोकसांगवी या औद्योगिक क्षेत्रामध्ये १५०० पेक्षा जास्त लहान-मोठे औद्योगिक कारखाने असून, या कारखान्यातून दरमहा लाखो टन स्क्रॅप निघत असते. यामधून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. यामध्ये कारखान्यातील व्यवस्थापन व स्क्रॅप ठेकेदार यांच्याच संगनमताने या नव्या माध्यमातून चांगला माल स्क्रॅप करून, कोट्यवधींची माया जमवली जात आहे. कारखान्यातून पक्का माल ज्या वाहनातून बाहेर काढला जातो, त्या वाहनामध्ये कमी माल भरून ते वाहन जाणीवपूर्वक चोरीला गेल्याचा बनावही अनेकदा केला जातो. काहीवेळा पोलीस यंत्रणाही गुन्हा दाखल करताना चार्जशिटमध्ये जाणीवपूर्वक उणिवा ठेवतात. चोरी गेलेल्या मालाचा विमा उतरिवलेला असल्याने चोरी गेलेल्या मालाची किंमत कारखानदाराला विम्यातून मिळत असते. त्यामुळे कारखानदारही याकडे दुर्लक्ष करतात. आता तर लोकप्रतिनिधींमध्येच भंगाराच्या व्यवसायात स्पर्धा निर्माण झाली आहे. झटपट पैसा मिळाल्याने अल्पावधीत त्यांच्या राहणीमानातही बदल झाला आहे.