शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

बटाटा व कांद्याची आवक वाढून भावात घट

By admin | Updated: January 23, 2017 02:24 IST

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात घट झाली आहे.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात घट झाली आहे. ही आवक १९०० क्विंटलने वाढली आहे. बटाट्याची आवक १६०० क्विंटलने वाढली, तर भावात ५० रुपयांनी घसरण झाली आहे. येथील बाजारात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगा यांची काहीच आवक झाली नव्हती ती या आठवड्यात झाली. एकूण उलाढाल २ कोटी ८० लाख रुपये झाली असून ही उलाढाल ८५ लाखांनी वाढली.कांद्याला या आठवड्यात ५०० ते ८०० रुपये असा प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल भाव मिळाला. चाकणमध्ये कांद्याची आवक वाढूनही भावात घट झाली आहे. कांद्याचा कमाल भाव ९०० रुपयांवरून ८०० रुपयांवर स्थिरावला. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल, शेळ्या-मेंढ्या यांच्या संख्येत वाढ होऊन किमती स्थिरावल्या. येथील मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण आवक ७९०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १९०० क्विंटलने वाढूनही भावात १०० रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव ९०० रुपयांवरून ८०० रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक २२५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १६०० क्विंटलने वाढून भावात ५० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव ७५० रुपयांवरून ७०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची आवक या आठवड्यात झाली नाही. जळगाव व बंदूक शेंगांची आवक अनुक्रमे ५ क्विंटल झाली.खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील पालेभाज्यांच्या बाजारात २ लाख ३५ हजार जुड्या मेथीची आवक झाली, तर २ लाख ८५ हजार जुड्या कोथिंबिरीची आवक झाली. शेपू आवक १५ हजार जुड्या झाली. शेलपिंपळगाव आवारात मेथीची ७ हजार ५०० जुड्या, तर कोथिंबिरीची २० हजार ५०० जुड्या आणि शेपूची आवक झाली नाही. चाकणला हिरव्या मिरचीची एकूण आवक ४३८ पोती झाली असून, मिरचीला १५० ते २५० रुपये असा भाव मिळाला.