शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

टाळे ठोकण्याचे आंदोलन स्थगित

By admin | Updated: April 25, 2017 03:52 IST

जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयाला टाळा ठोकणार असल्याचा इशारा आमदार

जुन्नर : जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयाला टाळा ठोकणार असल्याचा इशारा आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. परंतु, कायदा सुव्यवस्थेबाबत कोणतीही बाधा येऊ नये, तसेच सामान्य जनतेची अडचण होऊ नये म्हणून टाळे ठोकण्याचे आंदोलन स्थगित करून प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांना निवेदन दिल्याचे सोनवणे यांनी सांगितले. आपटाळे येथील मंडल अधिकारी यांच्याशी संबंधित प्रकरणावरून वादग्रस्त टिप्पणी करणऱ्या तहसीलदार आशा होळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जुन्नर तहसीलदार कार्यालयासमोर शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.तहसीलदार आशा होळकर यांची बदली करण्याची, तसेच निलंबन करण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांनी तसेच तालुक्यातील विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी या वेळी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच विविध प्रलंबित कामाबाबत तक्रारीचा पाढा प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांच्यासमोर वाचला. या वेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, धनंजय डुंबरे, दत्ता शिंदे, जुन्नरचे नगरसेवक जमीर कागदी, जयसिंग पोटे, संदीप उतर्डे, रोहिदास कोल्हाळ, किरण कुटे, प्रकाश गाडेकर, संतोष घोटणे, महेश शेळके, शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे, नीलेश चव्हाण, राजू कारभळ, विकास राऊत यांच्यासह नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी तहसीलदारांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी प्रशासकीय प्रमुख म्हणून दिलगिरी व्यक्त केली. तसेच शरद सोनवणे यांच्या मागणीसाठी तातडीने समाधानकारक तोडगा काढण्यात येईल. याबाबत सोनवणे व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करून जनतेला समाधानकारक असा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी आंदोलकांना दिले. (वार्ताहर)